बल्लारपूर येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

Mahawani

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जबलपूर, मध्यप्रदेश येथुन अटक.


महावाणी - विर पुणेकर
२४ जुलै २०२४

बल्लारपूर : ०७ जुलै रोजी बल्लारपूर येथील एका कापड व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब ( Petrol bomb ) च्या साहयाने हल्ला केला होता. हल्ला करून आरोपी पसार झाले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करून समोरील तपस सुरु केला होता.

सदर पेट्रोल बॉम्ब घटनेचे गांभिर्य ओळखुन मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन Hon. Superintendent of Police Mr. Mummaka Sudarshan ), अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारशा पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते.  त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जबलपूर Jabalpur )मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवून अटक करण्यात आली असुन, सदर आरोपी हे जबलपूर येथिल कुख्यात गँग स्टार ( Gang Star ) असुन त्यांचे वर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच उर्वरित दोन आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशन बल्लारपूर  यांचे मार्फतीने अटक करण्यात आले असुन पुढील तपास बल्लारपूर पोलीस करित आहे. ( mahawani ) ( ballarpur police )

To Top