अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण महाविद्यालय, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. #chandrapur #heavyrain

Mahawani


सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत, महाविद्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे.


महावाणी - विर पुणेकर
२१ जुलै २०२४

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील तीव्र अतिवृष्टीमुळे, जिल्हा प्रशासनाने २२ जुलै रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात अली आहे. सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जि सी ( Hon. Collector Shri. Vinay Gowda G C ) यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३० (२) (५) व (१८) नुसार निर्णय जाहीर केला आहे.


जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. शाळा प्रशासनांना तसेच पालकांना याची माहिती देण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत, महाविद्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे.


पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून, वाहतुकीची गैरसोय निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत अधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपतकालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय  चंद्रपूर संपर्क क्रमांक. ०७१७२ २५००७७ /०७१७२ २७२४८० वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ( Disaster Management Control Room, Collector Office Chandrapur Contact No. 07172 250077 /07172 272480 ) ( mahawani ) ( chandrapur )




To Top