कॉलोनी क्षेत्रात भीतीचे वातावरण.
१७ जुलै २०२४
राजुरा/गोवरी कॉलोनी : काल १६ जुलै रात्रौ ११ च्या सुमारास गोवरी कॉलनी स्थित शॉपिंग कॉम्पलेक्स ( A shopping complex located in Gowri Colony ) क्षेत्रात अस्वलीचे दर्शन अस्वलीच्या वावराने संपूर्ण गोवरी कॉलनी क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोवरी कॉलनी हे राजुरा जाणाऱ्या मार्गावर असल्याने सदर मार्गाने ये जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गोवरी कॉलनी येथील वेकोलि कर्मचारांचा कर्तव्यावर जाण्याचा हा मुख्य मार्ग आहे. गोवरी कॉलनी क्षेत्रात अस्वलीच्या वावराने नारीकांची कोंडी होत काल रात्रौ ११ पासून सकाळी दिवस उगवे परियंत नागरिकांनी सदर मार्गाने ये-जा करणे थांबवले होते.
गोवरी कॉलनी, बाबापुर, मानोली (बु.) क्षेत्र हे सर्वत्र वेकोलिच्या मोठं-मोठ्या मातीच्या ढिगाराने व्यापले असून मातीच्या ढिगाऱ्यावर मोठं-मोठे घनदाट जंगल उगले असल्याने अस्वली, वाघ, इत्यादी वन्य जीव इथे सहवास करतात मागील काही महिन्या पूर्वी कढोली (बु.) व गोवरी कॉलनी क्षेत्रात वाघाची देहशत निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी वाघाच्या भीतीने ये जा करण्याचा मार्गहि बदलला होता. परंतु सदर मार्ग हा सुलभतेचा आणि कमी अंतराचा असल्याने सदर क्षेत्रातील नागरिक ये जा करण्या करीता याच मार्गाचा जास्त वापर करतात परंतु वन्य जिवाच्या वावराने सदर मार्ग धोकादायक झाला असल्याचे स्थानिक नागरिक वर्तवत आहे. ( Bear behavior in Gowri Colony area )
सदर क्षेत्रामध्ये वन्य जीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून वन विभागाने या कडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. या अगोदर हि बाबापुर, मानोली (बु.) गावातील पाडिव प्राण्यावरती वाघाने हल्ला चढवून गाईला ठार केले होते या करीता वन विभागाने पंचनामा करून शेतकऱ्याला मोबदलाही दिला होता. वनविभागाला सदर क्षेत्राची उत्तम माहिती असून वनविभागाचे सदर क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे. ( mahawani ) ( gouri colony )