आरोग्य शिबिरात ३०० विद्यार्थ्यांची निशुल्क सिकलसेल तपासणी.

Mahawani


उपजिल्हा रुग्णालय व पत्रकार संघाचा पुढाकार : विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१६ जुलै २०२४

राजुरा : तालुका पत्रकार संघ व उपजिल्हा रुग्णालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15 जुलै रोजी सिकलसेल तपासणी शिबिर घेण्यात आला. यामध्ये शहरातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सुभाषभाऊ धोटे, उद्घाटक माजी आमदार ऍड. वामनराव चटप, प्रमुख अतिथी माजी ऍड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, खुशाल बोंडे, ऍड. अरुण धोटे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

        सामाजिक बांधिलकी जोपासत राजुरा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत मान्यवरानी अभिनंदन केले व  शुभेच्छा दिल्यात.

        शहरातील शिवाजी विद्यालय, आदर्श विद्या मंदिर ,जिल्हा परिषद हायस्कूल, सोनिया गांधी पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांची निशुल्कपणे सिकलसेल  तपासणी करण्यात आली. यावेळी शुभांगी पुरवटकर यांनी सिकलसेल व थैलसेमिया या आजारावर शास्त्रीय माहिती दिली . यासाठी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक जाधव तसेच तंत्रज्ञ शुभांगी पुरडकर,राधा दोरखंडे,यांचे सहकार्य लाभले. ( Sub District Hospital and Journalist Association rajura )

        निःशुल्क  सिकलसेल आरोग्य तपासणी शिबिरासाठी  राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बी.यु. बोर्डेवार, कार्याध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, उपाध्यक्ष प्रविण देशकर, सचिव बादल बेले, सहसचिव बाबा बेग, कोषाध्यक्ष गणेश बेले, जेष्ठ संचालक आनंद भेंडे, मसुद अहमद, संचालक राजेंद्र मोरे , आनंद चलाख, नितीन मुसळे, कृष्णकुमार तथा समस्त राजुरा तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन बादल यानी केले, प्रास्ताविक प्राध्यापक बी यू बोर्डेवार यांनी केले. ( mahawani ) ( rajura ) 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top