जिवंत काडतुस व पिस्टल जप्त

Mahawani

रेकॉर्ड वरील गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शांखाची कारवाई

  • महावाणी - विरेंद्र पुणेकर
  • २९ जुलै २०२४

चंद्रपूर | जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी तसेच मागील आठवड्यात २४ तारखेला राजूरात झालेल्या गोळीबाराचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन ( Hon. Superintendent of Police Mummaka Surdashan ) चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैदयरित्या अग्नीशस्त्र बाळगाणा-यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना आहे. त्याअनुषंगाने पो. नि. महेश कोंडावार ( police inspator Mahesh Kondawar ), स्थागुशा, चंद्रपुर पथके नेमुण अवैध शस्त्र बाळगाणा-याची बारकाईनबे माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ( Live cartridges and pistol seized )


सदर मोहीमे दरम्यान पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मौजा पाटाळा ता. भद्रावती जि. चंद्रपुर ( Patala, Bhadravati, Chandrapur ) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलीया खाली एक इसम आपल्या सोबत पिस्टल बाळगुन कथ्या रंगाच्या होंडा सिटी चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ०२ ए. एल. ८०५२ मध्ये बसुन आहे. सदर माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर इसमास ताब्यात घेवुन सदर इसमाच्या ताब्यात असलेल्या पाढं-या रंगाच्या थैलीची तपासणी केली असता, त्यामध्ये एक गावठी बनावटी पिस्टल व त्यात वापरण्यात येणारे एक नग जिवंत काडतुस मिळुन आले. सदर इसमास त्याचे नाव, गाव विचारात त्याचे क्राईम रेकॉर्ड चेक केले असता त्याचेवर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली असून सदर इसमा विरूदध पोलीस स्टेशन माजरी येथे कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदया अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी नामे मो. जमील अयनुल हक शेख ( Md. Jameel Aynul Haq Shaikh ) , वय- २२ वर्ष, रा. राजुर कॉलनी, वणी जि. यवतमाळ यास अटक करण्यात अली आहे. 


तसेच त्याच्या कडून १) एक गावठी बनावटी पिस्टल किमंत २५,०००/- रू २) एक नग जिवंत काडतुस किमंत ५०० /- रू. ३) जुनी वापरती होंडा सिटी चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ०२ ए. एल. ८०५२ ( M. H. 02 A. L. 8052 ) किमंत २,००,०००/- रू असा एकुण २,२५,५००/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.


सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा/स्वामीदास चालेकर, पोहवा/गजानन नागरे, पोहवा/अजय बागेसर, पोहवा/सतिश अवथरे, पोशि/प्रशांत नागोसे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे. ( mahawani ) ( spchamndrapur) ( mahapolice )

To Top