सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा. #sasti #wcl

Mahawani


सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी. 


  • महावाणी - विर पुणेकर
  • ०६ जुलै २०२४

राजुरा : तालुक्यातील सास्ती गावाची लोकसंख्या सुमारे ६००० च्या वर असून गाव परिसरात मुबलक प्रमाणात कोळसा असल्याने इथे गावाच्या सभोवताल वेकोलिने खाणीचे साम्राज्य उभे केले आहे. या खाणीचा अनेक बाबतीत गावक-यांना भयंकर त्रास होत आहे. वेकोलिने सन २०१५ पासून गावाचे पुनर्वसनाचे स्वप्न गावकऱ्यांना दाखवले परंतु आजपावतो पुर्नवसनाचे भिजत घोंगडे ठेवल्याने गावकऱ्यांन्या नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. इतक्या दीर्घ कालावधीत गावाचे पुनर्वसन होणे गरजेचे असताना वेकोलीने ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या आवाहनाला भिक सुद्धा घालताना दिसत नाही. 

        त्यामुळे चंद्रपूर १३ लोकसभा मतदार संघाच्या खासदार म्हणून आपण वेकोली बल्लारपूर यास निर्देश देऊन तसेच वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर सास्तीचे पुनर्वसन करावे. तसेच वेकोलिच्या कोळसा खाणी अगदी गावाच्या बाजूलाच आणल्याने त्या खाणीतील तीव्र ब्लास्टिंग मुळे गावातील अनेक नागरिकांचे घरांचे, छतांचे प्लास्टर पडले, सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही परंतु गावातील लोक आता जीव मुठीत धरून जगत आहेत. तसेच गावाचे अगदी बाजूलाच कोळशाची साठवण करणे वेकोलिने सुरु केल्याने उडणाऱ्या धूळ कणांनी व जळत असलेल्या कोळश्यामुळे लोक विविध आजाराने त्रस्त आहेत. ( Sasti Vashiachi eat. Demand through a statement to Pratibha Danorkar )

        तसेच येथील उर्वरित शेत जमीन बाबत लवकरात लवकर बैठक बोलावून मोबदला व नोकरी देण्यात यावी, येथील मट्टी कंपनी व्दारे कोळसा उत्खनन करण्यात येत आहे त्यात स्थानिक बेरोजगारांना न घेता परप्रांतीय कामगारांना घेत असल्याने युवक व ग्रामस्थांमध्ये वेकोली विरोधात तीव्र असंतोष आहे. सास्ती गाव वेकोलीच्या दत्तक गाव असूनही सी एस आर फंडातून गावाच्या विकासासाठी कोणताही निधी उपलब्ध होत नाही. वेकोलीने २ वर्षापासून ग्रामपंचायत मालमत्ता कर थकविला आहे. यामुळे वरील सर्व समस्या सोडविण्यासाठी वेकोली बल्लारपूर प्रशासनावर दबाव आणून समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी सास्ती येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी खासदार श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांची विश्रामगृह राजुरा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

        या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सास्ती ग्रा. प. सदस्य मधुकर झाडे, शिवसेनेचे विलास भटारकर, काँग्रेसचे मिथिलेश रामटेके, सुनिता माऊलीकर, राजश्री राजूरकर, सचिन नळे, नदीम शेख, नंदकिशोर चन्ने, प्रभाकर नळे, बाळू रोगे, मारोती माऊलीकर, आकाश माऊलीकर, दिवाकर झाडे, संतोष चन्ने, संदीप लोहबडे, संतोष गोनेलवार, दिनेश काळे, बंडू उपरे, रमेश कुंदलवार, सुधाकर खनके यासह सास्ती गावचे नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ( mahawani ) ( sasti ) ( chandrapur ) ( congress ) ( pratibha dhanorkar ) ( wcl )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top