वंचित बहुजन आघाडी, बल्लारपूर यांचे मा. मुख्यमंत्री यांना निवेदन. #ballarpur

Mahawani

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्या करिता मा. तहसीलदार साहेब बल्लारपूर यांच्यामार्फत दिले निवेदन.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१ जुलै २०२४

बल्लारपूर : वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन ,बल्लारपूर तालुका व शहर तर्फे मा. तहसीलदार साहेब बल्लारपूर यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांना राज्यातील हवालदार शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. व सातबारा कोरा करण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले. याकरिता प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष कविताताई गौरकार, वंचित बहुजन महिला आघाडी चंद्रपूर, जिल्हा महासचिव मधुकर जी उराडे वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर, जिल्हा सदस्य अश्विन शेंडे वंचित बहुजन युवा आघाडी चंद्रपूर

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री 'एकनाथजी शिंदे' साहेब यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज संबंधात केलेल्या घोषणा फक्त कागदावरच राहिले आहे. असे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहेत. सन २०२३ या  वर्षांमध्ये एकूण २८५१ तर चालू वर्षामध्ये आतापर्यंत १०६७ शेतकऱ्यांनी कर्जाच्या ज्या कंटाळून आपली जीवन यात्रा संपवून आत्महत्या केली आहे. मात्र असे असूनही शासनाने याबाबत कोणतेही ठोस पावले. उचललेले दिसत नाही. त्यामुळे वेळी शासनाने याकडे लक्ष देऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांचे संगोपन व त्याचे मुलाचे शिक्षणाचे संपूर्ण खर्च उचलण्या संदर्भात तरतूद करावी. यापुढे जगाच्या पोशिंदा त्रासून कंटाळून आत्महत्या करू नये. याकडे शासनाने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम हे माफ करण्यात यावी. याकरिता लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यात यावा. 

येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी संदर्भात योग्य ते भूमिका घ्यावी व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी आत्महत्या करू नये. याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी. त्यावर उपाययोजना करावी व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांचे जीवन संगोपनाच्या खर्च व मुलांचे शिक्षणाच्या खर्च व त्यांच्या मुलींच्या विवाह या सगळ्या बाबी लक्षात घेता. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक स्तरातून या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका संदर्भात वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तर्फे विचार करण्यात येईल व आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्याकरिता तालुका अध्यक्ष नम्रता ताई साव वंचित बहुजन महिला आघाडी, तालुका अध्यक्ष अभिलाष चूनारकर वंचित बहुजन युवा आघाडी, शहर अध्यक्ष रेखाताई पागडे वंचित बहुजन महिला आघाडी, तालुका महासचिव गौतम रामटेके वंचित बहुजन युवा आघाडी, ओम रायपुरे उमेश कडू धर्मेंद्र गायकवाड राकेश पेटकर प्रकाश तोगावकर रत्नमाला निरांजणे वतसला तेलंग गंगुबाई पेटकर संगीता शेंडे आशाताई भाले आणि इतर वंचित बहुजन आघाडीचे महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ( vanchit bahujan aghadi ) (ballarpur ) ( mahawani )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top