उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आ. सुभाष धोटेंचा सहभाग #rajura #subhashdhote

Mahawani


सरकारने प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची केली मागणी.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ जुलै २०२४

राजुरा : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनस्थळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote ) यांनी सहभागी होऊन संघटनेच्या मागण्या व आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने तातडीने संघटनेच्या सर्व न्याय्य मागण्या तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील ( Rajura Assembly Constituency ) राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ( A protest was held at Azad Maidan of Umaid Maharashtra State Women and Employees Board in Mumbai ) 

        या संघटनेकडून उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे., प्रभागसंघ स्तरावरील केडर - कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक व प्रभागसंघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडर प्रमाणे मानधनवाढ करणे., गावस्तरावर उपजीविका गाव फेरी आयोजनातून उपजीविका क्षमता बांधणी व बेरोजगार वर्धिनीना रोजगार संधी उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ( Rajura, Korpana, Jivati, Gondpipari ) ( mahawani ) ( Umaid )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top