Vehicles seized in sand theft | निरलीत शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर मुरूम उत्खनन - दोन ट्रॅक्टर जप्त

Mahawani

शासकीय जमिनीवर मुरूम उत्खनन करणाऱ्या दोन्ही ट्रॅक्टरांची तात्काळ जप्ती, संबंधितांवर गुन्हा दाखल

तलाठी विनायक आवारी यांनी रेत्या चोरी करताना पकडलेल्या गाड्यांचे फोटो
तलाठी विनायक आवारी यांनी रेत्या चोरी करताना पकडलेल्या गाड्यांचे फोटो

  • महावाणी - विर पुणेकर
  • २२ जुलै २०२४

राजुरा/निरली : निरली येथील शासकीय जमिनीवर बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरांची आज दुपार जप्ती करण्यात आली. या कारवाईत राकेश श्रीरंग हिंगाने यांच्या ट्रॅक्टर क्रमांक MH 34 CD 3582 आणि वैभव सुरेश वऱ्हाटे यांच्या ट्रॅक्टर क्रमांक MH 34 BV 9557 यांचा समावेश आहे.


ही कारवाई तलाठी विनायक आवारी आणि प्रशिक्षणार्थी तलाठी श्रीमती थोटे यांच्या नेतृत्वाखाली आज, २२ जुलै २०२४ रोजी दुपार ४:०० वाजता पार पडली. जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालय, राजुरा येथे जमा करण्यात आले आहेत. 


शासकीय जमिनीवर, नदी किंवा नाल्यात बेकायदेशीर उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे, आणि त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींवर IPC कलम 379 (चोरी) आणि IPC कलम 441 (शासकीय जमिनीवर अनधिकृत प्रवेश) यांच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 


या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर उत्खननाचे गंभीर परिणाम दाखवले आहेत.


शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात आली. दोषींना न्यायालयात हजर करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. -तलाठी, विनायक आवारी


#Rajura #Nirli #GovernmentLand #IllegalExcavation #SeizedTractors #VinayakAvari #RakeshHingane #VaibhavVarhate #Mahawani #Chandrapur #MurumExcavation

To Top