तो नेमका गेम चेंजर कोण कुठल्या पक्षाचा ?
१९ जुलै २०२४
राजुरा : विधानसभा निवडणुकीचे वारे आता बऱ्यापैकी सर्व दूर पर्यंत वाहू लागले आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये देखील समीकरणे आणि जुळवा-जुडवीचे सूत्र सुरू झाले आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसला मिळालेला भरघोस मताचा विजय पाहता ही मते विधानसभेमध्ये देखील आबाधित रहावी याचा प्रयत्न काँग्रेस द्वारे मोठ्या ताकतीने करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परंतु त्यांच्या समोर माजी आमदार ऍड. वामनरावजी चटप ( Former MLA Adv. Vamanraoji Chatap ) नावाचे कडवे आवाहन ह्या वर्षी उभे असून चटप साहेब यावेळी देखील संपूर्ण ताकतीने व रसदीने शेवटची निवडणूक म्हणून सदर विधानसभा निवडणुकीला आपला जोर आजमावणार असून यासाठी त्यांनी राजू शेट्टी यांच्या संघटनेबरोबर युतीहि केली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी कडून स्वर्गीय गोदरु पाटील जुमनाके हे गेम चेंजर ठरले होते. त्यांनी पहिलीच विधानसभा निवडूंक लढवून प्रस्तापित नेत्यांना घाम फोडला होता. यावेळी राजुरा विधानसभेला आम आदमी पक्षाकडून सुरज ठाकरे व शेतकरी संघटनेकडून ऍड. वामनरावजी चटप तसेच काँग्रेसकडून सुभाषजी धोटे सध्याच्या स्थितीत तरी हे निश्चित उमेदवार रिंगणात दिसून येत आहे.
तरी एक गेम चेंजर नेता हा काँग्रेसच्या गळ्याला लागतो की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि जर का तो यावेळी काँग्रेसच्या फळीत गेला तर काँग्रेसचा विजय हा निश्चितच समजण्यास दुमत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारा बाबत अजून पर्यंत संभ्रम कायम आहे. परंतु राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती ही निवडणूक जिंकेल कि नाही असे मागील विधानसभा निवडणुक व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून येत आहे.
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ची भूमिका भारतीय जनता पक्ष साकारेल की आप चे सुरज ठाकरे याकडे सर्व जनतेचे लक्ष वेधले गेले आहे. सुरज ठाकरे यांनी बऱ्यापैकी आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. नुकत्याच गेल्या रविवारी सुरज ठाकरे यांनी कार्यकर्ता चर्चासत्र व बुथ कमिटीच्या बोलवलेल्या बैठकीमध्ये हजारो कार्यकर्ते सामील झाल्याने सुरज ठाकरे व त्यांच्या पदाधिकारी तथा पक्षाची हिम्मत बऱ्यापैकी वाढलेली दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे संजय धोटे यांनी देखील शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे देवरावजी भोंगळे गेल्या वर्षापासून विविध उपक्रम राबवत नियमित जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अश्यातच दबक्या आवाजामध्ये विश्वसनीय सूत्रांद्वारे गेम चेंजर ठरणारा नेता काँग्रेस आपल्या गळ्याला लावण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत माहिती मिळाली आहे. सुभाष धोटे यावेळी परत विजय मिळवला तर त्यांचे मंत्रीपद निश्चित असल्याबाबत कार्यकर्ते सांगतात. आता हा गेम चेंजर नेता काँग्रेसच्या गळ्याला नेमका कसा लागेल अथवा हाच काँग्रेसला हरवण्याच्या मागचे कारण ठरेल आणि बाजी मारून जाईल हे निवडणुकीतूनच समजेल. ( Assembly Election 2024 ) ( mahawani ) ( rajura )