Gondpipri Sweepers: गोंडपिपरीतील सफाई कामगारांचा वेतनवाढीसाठी संघर्ष

Mahawani


येत्या १४ दिवसांत वेतन वाढ न झाल्यास मोठे काम बंद आंदोलनाचा इशारा




महावाणी : विर पुणेकर
१४ ऑगस्ट २०२४


गोंडपिपरी : १३ ऑगस्ट गोंडपिपरी नगरपंचायत अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांनी प्रशासनास १४ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कामगारांना गेल्या वर्षभरात वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही. सध्या, कामगारांना २०० रुपये दररोज मिळत आहेत, म्हणजेच महिन्याला फक्त ६००० रुपये. तथापि, शासनाने ठरवलेल्या किमान वेतनानुसार, कामगारांना १४००० रुपये वेतन मिळायला हवे.


शासनाचे आदेश असूनही नगरपंचायतीने या आदेशांची अंमलबजावणी केली नाही, तसेच वेतनवाढीचा मुद्दा कंत्राटदार आणि नगरपंचायतीने अद्याप न सोडविल्यामुळे कामगारांना आर्थिक पिळवणूक सहन करावी लागत आहे. जय भवानी कामगार संघटनेने श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे, पण नगरपंचायतीने त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. ( Jai Bhawani Labor Organization Mr. Surajbhau Thackre )


याविषयी कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, "शासनाने किमान वेतनानुसार वेतन देण्याचे आदेश असून हि नगरपंचायत प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही. हे अत्यंत खेदजनक बाब असून नगरपंचायत प्रशासन कामगारांचे शोषण करत आहे.


सर्व कामगारांना २८ ऑगस्ट २०२४ पासून काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान, नगरपंचायतीला अन्य कोणत्याही कामगारांना त्यां जागी काम करू देणार नसल्याचे सांगितले आहे. या आंदोलनामुळे नगरपंचायतीच्या सर्व कार्ये ठप्प होण्याची शक्यता आहे, तसेच यामुळे स्थानिक लोकांची सेवा देखील प्रभावित होईल. 


ज्या प्रकारे या कामगारांच्या युनियन आहेत त्याचप्रमाणे महसूल, नगरपंचायत, नगरपरिषद विभाग कर्मचाऱ्यांच्या देखील युनियन असतात व हे देखील आपल्या मागण्यांकरिता संप पुकारत काम बंद आंदोलन करत असतात तर तो कायदेशीर असतो परंतु हेच आंदोलन जर कामगारांनी केलं महसूल विभागाचे शासकीय कर्मचारी यांचे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न का करतात? हा प्रश्न नेहमी उपस्थित होतो, ही फार मोठी शोकांतिका आहे.


"जय भवानी कामगार संघटना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही," असे श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, “कर्मचार्‍यांवरील अन्याय थांबवण्यासाठी संघटना सर्वतोपरी प्रयत्नशील राहील.”


या परिस्थितीत, प्रशासनाच्या कार्यशाळेने वेतनवाढीच्या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा कामगारांचे आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल असे स्पष्ट आहे.


#MaharashtraNews, #ChandrapurCrime, #GadchiroliUpdates, #MaharashtraPolice, #DistrictCouncil, #MaharashtraDistricts, #VidarbhaNews, #CrimeInMaharashtra, #MaharashtraTheft, #MaharashtraPolitics, #MaharashtraAgriculture, #GovtJobsMaharashtra, #MaharashtraEmployment, #MaharashtraWeather, #MaharashtraEducation, #MaharashtraEconomy, #MaharashtraCrime, #MaharashtraLawAndOrder, #MaharashtraTraffic, #MaharashtraHealth, #MaharashtraDevelopment, #RuralMaharashtra, #Mahawani, #MahawaniNewHub, #MahawaniNews, #MaharashtraCulture, #MaharashtraFestivals, #MaharashtraSports, #MaharashtraInfrastructure, #MaharashtraTourism, #MaharashtraUpdates, #MaharashtraGovt, #MaharashtraTechnology, #MaharashtraEnvironment, #MumbaiNews, #PuneNews, #NagpurNews, #NashikNews, #AurangabadNews, #KolhapurNews, #ThaneNews, #SolapurNews, #SataraNews, #RaigadNews, #NandedNews, #AmravatiNews, #AhmednagarNews, #JalgaonNews, #YavatmalNews, #LaturNews, #DhuleNews, #BeedNews, #JalnaNews, #BhandaraNews, #WardhaNews, #OsmanabadNews, #PalgharNews, #SindhudurgNews, #RatnagiriNews, #ParbhaniNews, #WashimNews, #GondiaNews, #HingoliNews, #AkolaNews, #BuldhanaNews,

To Top