2024 Assembly Elections | मनसेच्या अंतर्गत कलहामुळे राजुरा विधानसभेत मोठे आव्हान

Mahawani

मनसेच्या अंतर्गत तणावामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील निवडणूक लढतीवर परिणाम होण्याची शक्यता

Archived photos
संग्रहित छायाचित्र

  • महावाणी : विर पुणेकर
  • २३ ऑगस्ट २०२४

चंद्रपूर : जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) स्थापनेपासूनच अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला ज्यांनी मनसेची पाळेमुळे रोवली होती, त्यातील बरीच मंडळी आता या पक्षात राहिलेली नाहीत. मात्र, या जुन्या नेतृत्वाखाली तालमीत पदाधिकारी झालेली मंडळी आज जिल्हा सांभाळत आहेत. यापैकी सर्वाधिक चर्चित नाव म्हणजे सुरज अरविंद ठाकरे. 2024 Assembly Elections


सुरज ठाकरे यांनी २००९ च्या राजुरा विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून १०,०४८ मते मिळवली होती. Rajura Assembly Election Results 2009 त्यांनी आपल्या तडफदार नेतृत्वाने संपूर्ण विदर्भात आपला दबदबा निर्माण केला होता. परंतु, पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांनी २०१९ मध्ये मनसेला रामराम ठोकला आणि आम आदमी पक्षाचा हात धरला. 


सुरज ठाकरे ( Suraj Thakre ) यांनी आता नव्या पक्षात प्रवेश करून आपला चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर निर्माण केला आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 


आज चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे (MNS ) स्थितीत आणखी गोंधळ झाला. एनडी हॉटेलमध्ये ( ND Hotel ) झालेल्या मनसेच्या बैठकीत राजुरा विधानसभा क्षेत्राच्या नगरसेवक सचिन भोयर ( Sachin Bhoyar ) यांच्या उमेदवारीची घोषणेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. वरिष्ठ कार्यकर्ते प्रकाश बोरकर यांनी विरोध करत आक्षेप घेतला आणि या आक्षेपाचे हाणामारीत रूपांतर झाले. 2024 Assembly Elections


या घटनेने मा. राज ठाकरे ( Raj Thakre ) यांच्या पक्षातील वचक कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, २००९ मध्ये सुरज ठाकरे यांनी मिळवलेल्या मतांचा आकडा २०२४ मध्ये ह्या उमेदवाराला मिळवता येईल का, हा प्रश्न राजुरा विधानसभा क्षेत्रातील मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. Rajura Assembly Election 2014 २०१४ आणि २०१९ Rajura Assembly Election 2019 च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना ५००० मतांचा आकडाही मिळवता आलेला नाही, यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात पक्षाला आवश्यक त्या प्रमाणात जनाधार मिळवता आलेला नाही. पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी उमेदवार दिला नसल्यामुळे, चंद्रपूरचे माजी नगरसेवक सचिन भोयर येणाऱ्या दोन महिन्यांत किती जनाधार मिळवू शकतील हे काळच ठरवेल. २००९ नंतर पक्षाची झालेली अधोगती, मिळालेली तुटपुंजी मते आणि अंतर्गत तणावामुळे पक्षाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


#MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #mahawaniNews #mahawani #MahawaniNewsHub #VeerPunekar #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews #ChandrapurUpdates #MaharashtraEvents #DailyNews #LocalUpdates #BreakingMaharashtra #ChandrapurLocal #RegionalNews #TopHeadlines #2024AssemblyElections

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top