Confiscation of marijuana: गांजा तस्करीचा मोठा साखळा उजेडात

Mahawani


राजुरात ९ लाखांचा गांजा जप्त: हरियाणातील आरोपीला अटक


Cannabis worth 9 lakh seized in Rajura


महावाणी: विर पुणेकर  
१७ ऑगस्ट २०२४


राजुरा: १५ ऑगस्ट रोजी दुपार १२:३० च्या सुमारस राजुरा शहराच्या बाहेरील ओमसाई राम मंगल कार्यालय रामोरील झोपडीत मोठ्या प्रमाणात गांजा साठवण्यात आला असल्याची माहिती मिळताच राजुरा पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी तब्बल ९ लाख रुपये किमतीचा ८९ किलो गांजा जप्त केला आणि हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील आझाद रामफळ सिंग (३५) याला अटक केली.


गोपनीय माहितीवर आधारित कारवाईचा तपशील

    राजुरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, बल्लारपूर-राजुरा रस्त्यावरील एका झोपडीत गांजाचा मोठा साठा केला आहे. याआधारे डीबी पथकाने घटना स्थळावर तातडीने छापा टाकला. पोलिसांनी पंचांच्या साक्षीने झोपडीची तपासणी केली. झोपडीत साठवलेल्या सामानात गांजाच्या पिशव्या सापडल्या, ज्याचे वजन ८९ किलो होते. त्याची बाजारात किंमत ९ लाख रुपये एवढी आढळून आली आहे.


हरियाणातून तस्करी: गांजाच्या मोठ्या साखळीचा उलगडा

    पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की, आरोपी आझाद रामफळ सिंग हा हरियाणातून गांजाची तस्करी करत राजुराच्या सीमेजवळील भागात आणत होता. तेलंगणा राज्याच्या सीमेजवळील राजुरा परिसरात गांजाची तस्करी पूर्वीपासूनच सक्रिय आहे. या तस्करीच्या साखळीचा पुढील तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी या तस्करीत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.


एनडीपीएस कायद्यांतर्गत कठोर कारवाई

    या प्रकरणात आरोपी आझाद रामफळ सिंग ( Azad Ramphal Singh ) याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कलम ८ (ब) २० (की) (ii)(C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्याचे हे कलम मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी लागू होतो. यामुळे आरोपीला दीर्घकालीन शिक्षा होण्याची शक्यता आहे.


गांजाच्या तस्करीविरुद्ध पोलिसांची युद्धपातळीवर कारवाई

    राजुरा पोलिसांच्या डीबी पथकाने गांजाच्या तस्करीविरुद्ध केलेल्या या महत्त्वपूर्ण कारवाईत जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे आणि पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे मोलाचे योगदान होते. या कारवाईत डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, भीष्मराज सोरटे, नरेश उरकुडे, किशोर तुमराम, राजनारायण ठाकूर, नूतन डोर्लीकर, वेणू नुतलवार, तिरुपती जाधव, महेश बोलगुडवार, रामराव बिंगेवाड, योगेश पिदुरकर, अविनाश बांबोळे, आकाश पिपरे यांनी सहभागी होऊन मोठे यश मिडवले.


तस्करीची व्याप्ती आणि स्थानिकांचे आवाहन

    राजुरा आणि आसपासच्या परिसरात गांजाची तस्करी ही एक गंभीर समस्या बनली आहे. या तस्करीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अधिक गुप्तचर तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना गांजाची तस्करी करणाऱ्या किंवा संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिस दलावर विश्वास ठेवावा, असे पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे.


गांजाच्या व्यसनातून युवकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न

    राजुरा परिसरात गांजाच्या व्यसनाचा प्रभाव वाढत असल्याने राजुरा पोलीस निरीक्षक श्री. योगेश पारधी ( PI . Yogesh Pardhi ) आणि स्थानिक प्रशासनाने युवकांना या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालये आणि युवक संघटनांमध्ये गांजाच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.


स्थानिक नेतृत्वाची प्रतिक्रिया

    या कारवाईनंतर स्थानिक राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनी पोलिसांच्या कठोर कारवाईचे स्वागत केले असून, भविष्यात अशाच प्रकारे तस्करीविरुद्ध कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, स्थानिकांच्या सहकार्यानेच अशा गैरकृत्यांना आळा घालता येईल, असेही म्हटले आहे.


पुढील तपास आणि आव्हाने

    या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणात इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हरियाणातील संबंधित भागात तपासाचे जाळे टाकले आहे. तसेच, गांजाच्या तस्करीच्या या मोठ्या साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अधिक गुप्तचर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.


#Rajura #GanjaSeizure #DrugBust #HaryanaDrugDealer #NDPSAct #DrugTrafficking #PoliceOperation #Chandrapur #DrugWar #PoliceRaid #MahawaniNews #ChandrapurNews #korpanaNews #jiwatiNews #GonpipariNews


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top