धोकादायक पर्यायी मार्गाने नागरिकांच्या जीवाला धोका
१८ ऑगस्ट २०२४
चंद्रपूर : आरवट आणि हडस्ती या दोन गावांच्या मध्यस्थानी असलेला पूल अनेक महिन्यांपासून संथ गतीने उभारला जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला या पुलाचे काम मोठ्या जोमाने सुरू झाले होते. परंतु, कालांतराने कामाचा वेग कमी झाल्यामुळे अजूनही पूल पूर्णत्वास आलेला नाही. यामुळे गावातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुलाचे काम सुरू असल्याने, या भागातील वाहतुकीसाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, हा मार्ग कच्च्या स्वरूपाचा आहे. पावसामुळे या मार्गावर चिखल साचलेला असून, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच, रस्त्यावर टाकलेली रवाळी गिट्टी मार्गावरती आल्याने मार्ग अधिकच धोकादायक झाला आहे. नागरिकांना या अस्थायी मार्गावरून वाहन चालवताना प्रचंड अडचणी येत आहेत.
https://maps.app.goo.gl/FL2xsv8HHpdkd6wu9
पुलाच्या बांधणीसाठी उभारलेला सुमारे २० फूट खोल खड्डा या मार्गाच्या बाजूला आहे, ज्यामुळे वाहन चालवताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. थोडीशी चूक झाली तरी वाहन खड्ड्यात पडण्याचा धोका वाढला आहे. अनेक वाहनचालकांचे वाहन या चिखलमय मार्गावरून घसरून पडले आहेत, ज्यात काही जण गंभीर जखमी देखील झाले आहेत.
या समस्यांची वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून अजून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या संतापाचा पारा चढला आहे. त्यांच्या मते, प्रशासनाने लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे, अन्यथा या मार्गावरून ये-जा करणे आणखी धोकादायक ठरू शकते.
संपूर्ण आरवट, हडस्ती आणि नजीकच्या संलग्न गावातील नागरिक या समस्यांनी त्रस्त झाले आहेत. या पुलाच्या कामामुळे त्यांची दैनंदिन जीवनशैली विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने तातडीने पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ( Aravat-Hadasti )
#MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraCrime #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #Mahawani #MahawaniNewHub #MahawaniNews #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews #AravatBridge #HadastiBridge #InfrastructureIssues #RoadSafety #Mahawani