Bhushan Phuse | भूषण फुसे यांनी जिंकलीत लोकांची मने

Mahawani

संपूर्ण तालुक्यात त्यांचा उपक्रमाची होतेय चर्चा ! 

  • महावाणी - विर पुणेकर
  • ०४ ऑगस्ट २०२४

चंद्रपूर : सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी वाढदिवसाच्या निमित्याने आगळावेगडा उपक्रम राबवीला राजुरा विधानसभा क्षेत्रातील धार्मिक स्थळाना भेटी, रुग्णांना फळ वाटप, शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य केले तसेच विधानसभेतील अनेक गावातील समर्थकांनी विविध उपक्रम राबविले.


भूषण फुसे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रश्नांना आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम केले आहे. जीवती, कोरपना, गोंडपिपरी, राजुरा तालुक्यात त्यांचा समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच भूषण फुसे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमे राबवत विविध धार्मिक स्थळांना भेटी, विविध ठिकाणी त्यांचा समर्थकांनी वृक्षारोपण, गोंडपिपरी ( gondpipari ) येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप, करंजी ( karanji ) जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य इत्यादी वाटप करत साजरा केला. 


गडचांदूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर, संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर कमिटी तर्फे भूषण फुसे यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थिती होती.


उपक्रमे

गोंडपिपरी तालुक्यातील जोगापूर येथील गुरुद्वाराचे फुसे यांनी घेतले दर्शन, जोगापूर गुरुद्वारा कमिटी पदाधिकाऱ्यांचा सत्कार, पंचशील बुद्ध विहार गोडपिंपरी येथील भंतेजींना चिवरदान, गोंडपिपरी स्थित राम मंदिराचे दर्शन, करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक उपयोगी साहित्य वाटप, विध्यार्थाना पादत्राणाचे वाटप, शासकीय रुग्णालय गोंडपिपरी येथे फळ व नवजात शिशूंची किट वाटप करण्यात आले. 


या शनी भूषणभाऊ फुसे यांनी स्वतःच्या हाताने चिमुकलांना पादत्राण घालून दिल्या. हे क्षण बघताच सर्व चिमुकले व त्यांचे पालक तसेच शिक्षक भावनिक झाले होते.


#bhushanphuse #chandrapur #mahawani #rajura #korpana 

To Top