सामाजिक बांधिलकी जोपासत सरपंच आशाताई उरकुडे यांचा वाढदिवस साजरा ! #baban-urkude

Mahawani


ज्योतिबा विद्यालय राजुरा येथील वसतिगृहाला २५,००० रोख आर्थिक मदत


महावाणी - विर पुणेकर
०६ ऑगस्ट २०२४


राजुरा : तालुक्यातील गोवरी ग्रामपंचायतच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. आशाताई बबन उरकुडे यांचा वाढदिवस ज्योतिबा विद्यालय, राजुरा येथे साजरा करण्यात आला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे ( Babanbhau Urakude ) यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेने चालू केलेल्या वसतिगृहाला २५,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.


समाजात आणि राजकारणात काम करत असताना समाजउपयोगी कार्य करून जनतेला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या प्रसंगी करण्यात आला. विद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हे वसतिगृह चालू करण्यात आले आहे. या कार्यामुळे तालुक्यातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे.


या दृष्टिकोनातून कोणताही गाजावाजा न करता समाजाचे देणे म्हणून हा सोहळा पार पडला. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत करून हा आनंदसोहळा साजरा करण्यात आला.


या प्रसंगी शाळेचे सचिव सुभाष ताजने सर, मुख्याध्यापक पाटील सर, गुरुदेव सेवा दलाचे उपासक शिक्षक मेश्राम सर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना तालुका समन्वयक श्री प्रदीप येनुरकर, रामपूरच्या सरपंच सौ. निकीता रमेश झाडे, मानोली बाबापुरच्या उपसरपंचा सौ. सत्यशिला प्रशांत वरारकर, अंतर्गवाच्या पोलिस पाटील सौ. सूवर्णा शैलेश कावळे, सौ. राणी लांडे, एच एम एस युनियन अध्यक्ष श्री अशोक भाऊ चीवंडे, एच एम एस युनियन वेल्फेअर सदस्य श्री रंगराव कुळसंगे, वेल्फेअर श्री रवि भाऊ डाहुले, एरिया सेफ्टी कमिटी सदस्य श्री विजय भाऊ कानकाटे, सिनियर नेताजी एच एम एस युनियन आर आर यादव जी, भवानी दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष कु. सुजित कावळे, संचालक केतन जूनघरे, सचिव गणेश चोथले, सदस्य हर्षल निमकर, तुषार दिवसे, बंटी धवस, प्रवीण आस्वले, सतीश शेरकि, प्रज्वल बोबडे, समाधान कोरडे, प्रवीण मोरे, उमेश रोहने व मंगेश काकडे, मॉर्निंग वॉकचे टोपरे सर, आसमपल्ली सर, दिनेश पारखी मराठा सेवा संघ, सत्यपाल गेडाम, शैलेश कावळे, विद्यालयातील समस्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. ( mahawani ) ( rajura ) 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top