Celebration Raksha Bandhan | शिवसेना महिला आघाडीचा भव्य रक्षाबंधन सोहळा

Mahawani


शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांना औक्षण करित बांधल्या राख्या

Celebration Raksha Bandhan


महावाणी : विर पुणेकर
२० ऑगस्ट २०२४


चंद्रपुर : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासात महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला मान्यता देत "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचे दोन हप्ते जमा करण्याचा निर्धार पूर्ण केला आहे. ह्या भावनेतून, शिवसेना महिला आघाडीने २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४:०० वाजता सा. बां. विभागाच्या VIP विश्राम गृह येथे भव्य रक्षाबंधन सोहळा आयोजित केला.


या सोहळ्यात शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी यांना औक्षण करीत राख्या बांधण्यात आल्या. शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर जिल्हाप्रमुख सौ. मिनल आत्राम आणि महिला पदाधिकाऱ्यांनी पार्टी संघटन मजबूत करण्याच्या संकल्पात महिलांचे पक्ष प्रवेश व नियुक्त्या केल्या आणि रक्षाबंधन सोहळा साजरा केला.


कार्यक्रमात शिवसेना चंद्रपूर तालुका संघटक संजय शिंदे, वैद्यकीय जिल्हाप्रमुख व कामगार जिल्हा उपाध्यक्ष दीपक कामतवार, युवासेना चंद्रपूर महानगर प्रमुख दिपक रेड्डी, घुग्घूस शहर प्रमुख महेश डोंगे, चंद्रपूर उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, भद्रावती नगरसेवक नाना दुर्गे, महिला आघाडी चंद्रपूर तालुका प्रमुख कृष्णाताई सुरमावार, भद्रावती तालुका प्रमुख योगिताताई घोरुडे, मूल तालुका प्रमुख भारतीताई राखुंडे, बल्लारपुर तालुका प्रमुख शालूताई कन्नाके, पोंभूर्णा तालुका प्रमुख वंदनाताई टेकाम, भद्रावती उप-तालुका प्रमुख राधाबाई कोल्हे, भद्रावती उपनगर प्रमुख मंगलाताई आसुटकर, मंदाताई धान्डे, सविताताई तुरारे, सुनंदाताई खारकर, शालूताई बुच्चे, वंदनाताई कुंदावार, पूजाताई खोबरे आणि विद्याताई तिमजे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रम रंगला.


यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या वरोरा तालुका प्रमुखपदी सौ. अल्का योगेश पचारे यांची नियुक्ती करण्यात आली. रक्षाबंधनाच्या दिवशी जमा झालेली ओवाळणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या निता सुधाकर शेडमाके यांना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत म्हणून देण्यात आली.


महिलांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाच्या योजनांना समर्थन देऊन सरकारची ताकद वाढवण्याचा संकल्प केला आहे. विरोधकांच्या आरोपांना नकार देत अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी, लखपती दिदी यासारख्या योजनांचा लाभ घेऊन विरोधकांना चपराक देण्याची प्रतिज्ञा केली आहे. महिलांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सक्रिय सहभाग देण्याचे ठरवले आहे.


#ShivSena #WomenWing #RakshaBandhan #Chandrapur #ChiefMinister #SantoshParkhi #ShivSenaOfficials #PoliticalMembership #WomenEmpowerment #SocialDevelopment #MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraCrime #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #Mahawani #MahawaniNewHub #MahawaniNews #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top