महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८, IPC आणि महाराष्ट्र पशू संरक्षण कायद्या अंतर्गत जनावरांवर कारवाई
१८ ऑगस्ट २०२४
राजुरा : चुनाला येथील ग्रामस्थांना मोकाट जनावरांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे जनावर मुख्य रस्त्यावर भटकत असल्याने वाहतूतिची कोंडी होत सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येते आहे. विशेषतः मागील महिन्यात रेल्वे कॉलनीतील एका महिलेचा जनावरांमुळे अपघाती मृत्यू झाल्यामुळे हा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे त्वरित कार्यवाहीची मागणी केली होती.
ग्रामस्थ्यांच्या तक्रारींवरती त्वरित अंमलबजावणी करत ग्रामपंचायत चुनाला मार्फत जनावरांच्या मालकांना या संदर्भात सुचना दिल्या होत्या. तसेच, ग्रामपंचायतीने मोकाट जनावरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नोटीस बजावली आणि गुप्तपणे मुणारी पण दिली. तरीही, मोकाट जनावरांच्या मालकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि जनावरांच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी जोर धरू लागल्याने.
ग्रामपंचायतने गंभीरपणे विचार करून काल दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी गावकऱ्यांच्या सहकार्याने जनावरावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. या कारवाईत, मोकाट जनावरांना राजुरा येथील कांजी हाऊसमध्ये टाकण्यात आले. ग्रामपंचायतीने यासाठी भारतीय दंड संहिता (IPC) कलम २६८ (सार्वजनिक त्रास), २८३ (सार्वजनिक रस्त्यावरील अडथळे) आणि महाराष्ट्र पशू संरक्षण कायदा १९७६ अंतर्गत कारवाईची योजना केली आहे. तसेच मोकाट जनावरांवर कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ५३ (धारा ५३) अंतर्गत मिळाला आहे. या अधिनियमाच्या अंतर्गत ग्रामपंचायतला सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, आणि सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा अधिकार आहे.
या कारवाईमुळे गावातील नागरिकांना आणि वाहतूकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, तसेच भविष्यकाळात असे प्रकार होऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतने सातत्याने कार्यवाही सुरू ठेवण्याचे आश्वासन ग्रामस्तांना दिले आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आणि समाजातील सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली आहे.
#MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraCrime #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #Mahawani #MahawaniNewHub #MahawaniNews #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews #Chunala#StrayAnimals#VillagePanchayat#TrafficObstruction#PublicSafety#Rajura#IndianPenalCode#MaharashtraAnimalProtectionAct#MahawaniNews