चंद्रपूर महानगरपालिकेची अनावश्यक पाणी वापराविरुद्ध कठोर कारवाई
२१ ऑगस्ट २०२४
चंद्रपूर : नळावरील मीटर काढून पाण्याचा गैरवापर करणाऱ्या व टिल्लू पंपद्वारे पाण्याचा अनावश्यक वापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेने IPC कलम ४२९ अंतर्गत जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांच्या नळ कनेक्शनवर तात्पुरता अडथळा निर्माण करून दंड ठोठाविण्यात आले आहे. दंड न भरल्यास त्यांना IPC कलम ४२० अंतर्गत काळ्या यादीत टाकले जाईल.
मनपाने शहरातील सर्व नळ जोडणींवर जलमापक (मीटर) लावले असून, जानेवारी महिन्यापासून मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे. वैद्य नगर येथील शिवकृपा फर्निचर जवळील रहिवासी( Kishore Vitthalrao Ridhe ) किशोर विठ्ठलराव रिधे, राजेश बागेल ( Rajesh Bagel ) व सुरेश नत्थुजी इंगळे ( Suresh Natthuji Ingle ) यांनी स्वतःच्या घरच्या नळ जोडणीवरील जलमापक काढून टिल्लू पंपद्वारे पाण्याचा अनावश्यक वापर केला आहे, असे मनपा पथकाच्या पाहणीदरम्यान आढळले आहे.
मनपाद्वारे सर्व नळ जोडणींवर मीटर लावल्यामुळे पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले असून, त्यानुसार अचूक देयक आले आहे. तथापि, काही नागरिक मीटरसाठी लागणारे पाईप काढून, पाणी कमी बिलात वापरतात. या पद्धतीमुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद राहतो आणि बिल कमी येते, तसेच टिल्लू पंपद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते, ज्यामुळे इतर नळधारकांना कमी पाणी मिळते.
शहरातील पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, मनपातर्फे टिल्लू पंप वापरणाऱ्यांविरुद्ध IPC कलम ४२९ अंतर्गत कठोर कारवाई सुरू केली असून नळावरील मीटर काढल्यास किंवा विद्युत पंप/ टिल्लू पंप लावल्यास, मनपाच्या जप्ती पथकाद्वारे तातडीची कारवाई केली जात आहे.
https://x.com/Mahawaninews/status/1826284644528181659t=EVF2X7xJvcbIxHUxHGFFFg&s=19
#Chandrapur #MunicipalCorporation #WaterUsage #Meter #Misuse #IPC #Section429 #TilluPump #MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraCrime #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #Mahawani #MahawaniNewHub #MahawaniNews #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews