बामणवाडा येथील स्टेला मॅरिस कॉन्व्हेंट स्कूल चे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खड्डेमुक्त करा !

Mahawani


श्री. सुरजभाऊ ठाकरे, कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांची मागणी



महावाणी - विर पुणेकर
०६ ऑगस्ट २०२४

राजुरा/बामणवाडा  : स्टेला मॅरिस कॉन्व्हेंट स्कूल, बामणवाडा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर या शाळेत लगत २२ मीटरचा रोड आहे. परंतु या रोडवर या शाळेचे अतिक्रमित वॉल कंपाऊंड चे बांधकाम करण्यात आल्यामुळे हा रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. याशिवाय सदर रस्त्यावर डांबरीकरण नसल्याकारणाने या कच्च्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे असल्याने पावसाळ्यामध्ये या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यावरून शाळेत येणाऱ्या - जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह येथील ये-जा करणाऱ्या नागरिकांचे अपघात दिवसेंदिवस वाढतच असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी श्री. सुरजभाऊ ठाकरे, ( Mr. Surajbhau Thackeray ) कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर, यांच्याकडे केल्या आहे. ( Stella Mary Convent School, Bamanwada ) 


श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करत या समस्येचा आढावा घेत सदर तक्रारीचे निवारण करण्याकरिता संबंधित ग्रामपंचायत तथा प्रशासनाला या अपघातांवर अंकुश लावून येथील नागरिकांच्या सोयीकरिता सदर रस्ता हा रुंद करून खड्डेमुक्त करण्याची मागणी केली. यासह सदर समस्यांचे तात्काळ निवारण न केल्यास येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर समस्त नागरिकांसह आंदोलन करणार असा संबंधित प्रशासनाला इशारा दिला आहे.


आज दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय बामणवाडा येथील सचिव श्री. पी. आर. मिश्रा ( Mr. P. R. Mishra ) यांनी निवेदनाची दखल घेत १५ ऑगस्टच्या आधी स्टेला मॅरिस कॉन्व्हेंट स्कूल चे अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करू व 'खड्डेमुक्त रस्ता' करून देऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळेस उपस्थित श्री. सुरजभाऊ ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक - राहुल चव्हान, निखिल बाजाईत, अनिकेत मेश्राम, जय भवानी कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष, राजुरा, रोशन बंडेवार, महेश ठाकरे, रोहित पुल्लीवार आदी सहकारी उपस्थित होते. ( mahawani ) ( rajura ) 

To Top