Forest Department | वन गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर

Mahawani


अवैध व्यवसाय, वाहतूकीवर कठोर पाऊले उचलून कडक कारवाईचे आदेश


  • महावाणी : विर पुणेकर
  • ११ ऑगस्ट २०२४

राजुरा : वन परीक्षेत्रातील वाढत्या वन गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू ( Deputy Conservator of Forest Shweta Boddu ) यांनी राजुरा येथे नुकतीच एक महत्वाची सभा घेतली. या सभेत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारीविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.


उपवनसंरक्षक बोड्डू यांनी विशेषत: वनक्षेत्रात रात्रपाळी व दिवसपाळी गस्त नियमितपणे घालण्याचे निर्देश दिले आहेत. यासह, गुप्त बातमीदारांमार्फत माहिती संकलित करून वन गुन्हेगारांविरुद्ध त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या सूचना लक्षात घेऊन, नव्याने रुजू झालेले उपविभागीय वनाधिकारी पवन कुमार जोंग यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश डी. येलकेवाड ( Forest Range Officer Suresh D. Yelkevad ) यांनी तातडीने विविध पथके तयार केली आहेत. ( Sub Divisional Forest Officer Pawan Kumar Jong )


गेल्या दोन दिवसांपासून, या पथकांनी राजुरा परीसरातील संशयित ठिकाणांवर गस्त वाढवली आहे. यावेळी, अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम ३७९ (चोरी), वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (वनातील नियमभंग), आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ (पर्यावरणीय नुकसान) यांचा समावेश असलेली गुन्हा नोंदवण्यात आली आहे.


ट्रॅक्टर जप्त करून आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक अटक अहवाल ( Preventive Arrest Report ) जारी करण्यात आला आहे. वनविभागाच्या या कठोर कारवाईमुळे वन गुन्हेगारांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली असून, भविष्यात अशा कारवायांचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


#mahawani #rajura #forestdepartment #chandrapur #maharashtra #वन गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top