terrible accident : भीषण अपघातात चार युवक जागीच ठार, एक गंभीर जखमी

Mahawani


नवीन आय. पी. सी. कलमानुसार गुन्हे दाखल

नवीन आय. पी. सी. कलमानुसार गुन्हे दाखल

  • महावाणी : विर पुणेकर
  • १३ ऑगस्ट २०२४

चंद्रपूर/गडचांदूर : १३ ऑगस्ट रात्रौ २ वाजताच्या सुमारास गडचांदुर - भोयगाव मार्गावर लखमापूर येथील दूध डेअरी जवळ भीषण अपघात झाला. चारचाकी वाहनाने मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने जिवती तालुक्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे.


प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त युवक आपल्या चारचाकी वाहन (क्रमांक MH-04-FR-4081, अर्तिगा) मधून जिवतीकडे गडचांदुर - बोयगाव मार्गाने परत जात होते. लखमापूर येथील दूध डेअरीजवळ, मार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला (क्रमांक MH-18-N-6656) मागून जोरदार धडक दिल्याने हा भयानक अपघात घडला.


या अपघातात सूरज गव्हाले (२२), सुनील किजगिर (२७), आकाश पेंदोर (२२), आणि श्रेयश पाटील (२२) यांचा जागीच मृत्यू झाला. अजय गायकवाड (२५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सुधारित IPC कलम 106(1) आणि 281 अन्वये गुन्हा दाखल:

सदर घटनेबाबत गडचांदुर पोलिसांनी नवीन IPC कलम 106(1) (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे) आणि IPC कलम 281 (अविचाराने किंवा निष्काळजीपणे वाहन चालवणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याशिवाय, मोटार वाहन कायद्याचे कलम 122 (वाहन नियंत्रित न ठेवणे), 134(A) (अपघातानंतर मदत न पुरवणे), 125(B) (रस्त्यावर अडथळे निर्माण करणे) आणि 134(B) (अपघाताची माहिती पोलिसांना न देणे) यांचा आधार घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेची माहिती मिळताच गडचांदुर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून पुढील तपास गडचांदुर पोलीस मा. पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी कदम ( Hon. Police Inspector Mr. Shivaji Kadam ) यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.


#MaharashtraNews, #ChandrapurCrime, #GadchiroliUpdates, #MaharashtraPolice, #DistrictCouncil, #MaharashtraDistricts, #VidarbhaNews, #CrimeInMaharashtra, #MaharashtraTheft, #MaharashtraPolitics, #MaharashtraAgriculture, #GovtJobsMaharashtra, #MaharashtraEmployment, #MaharashtraWeather, #MaharashtraEducation, #MaharashtraEconomy, #MaharashtraCrime, #MaharashtraLawAndOrder, #MaharashtraTraffic, #MaharashtraHealth, #MaharashtraDevelopment, #RuralMaharashtra, #Mahawani, #MahawaniNewHub, #MahawaniNews, #MaharashtraCulture, #MaharashtraFestivals, #MaharashtraSports, #MaharashtraInfrastructure, #MaharashtraTourism, #MaharashtraUpdates, #MaharashtraGovt, #MaharashtraTechnology, #MaharashtraEnvironment, #MumbaiNews, #PuneNews, #NagpurNews, #NashikNews, #AurangabadNews, #KolhapurNews, #ThaneNews, #SolapurNews, #SataraNews, #RaigadNews, #NandedNews, #AmravatiNews, #AhmednagarNews, #JalgaonNews, #YavatmalNews, #LaturNews, #DhuleNews, #BeedNews, #JalnaNews, #BhandaraNews, #WardhaNews, #OsmanabadNews, #PalgharNews, #SindhudurgNews, #RatnagiriNews, #ParbhaniNews, #WashimNews, #GondiaNews, #HingoliNews, #AkolaNews, #BuldhanaNews

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top