Gadchandur Amlanala | अमलनाला धरण पर्यटन शुल्क आकारण्याच्या निर्णयाला गडचांदूरवासीयांचा तीव्र विरोध

Mahawani

सुरज ठाकरे यांची शुल्क रद्द करण्याची मांग

Photograph related to Amlanala Dam
अमलनाला दर्शवणारे संग्रहित आणि ग्राफिक्सने तयार केलेले छायाचित्र

  • महावाणी : विर पुणेकर
  • २६ ऑग २०२४

गडचांदूर : गडचांदूर शहराच्या सीमारेषेवर असलेल्या अमलनाला धरणाच्या परिसरा अलिकडे मोठ्या प्रमाणावर सौंदर्यकरण करण्यात आले आहे. या सौंदर्यकरणाच्या अंतर्गत एक भव्य उद्यान तयार करण्यात आलेले आहे, ज्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. परंतु, या उद्यानात प्रवेश करण्यासाठी स्थानिक रहिवाशांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे गडचांदूरवासीयांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. Gadchandur Amlanala


आम आदमी पक्षाचे नेते सूरज ठाकरे यांनी याविषयी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, आणि पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र लिहून या निर्णयाविरोधात जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सूरज ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, गडचांदूर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक प्रदूषणाच्या समस्येला गेली अनेक वर्षे सामोरे जात आहेत. येथील अवजड वाहतुकीमुळे प्रदूषणाचा स्तर वाढत चालला आहे, ज्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


अमलनाला धरणाच्या परिसरात स्थानिक नागरिकांना काहिस्या विश्रांतीचा अनुभव मिळावा म्हणून सौंदर्यकरण करण्यात आले परंतु उलट स्थानिकांकडून या सुविधांसाठी शुल्क आकारणे हा त्यांच्या हक्कांचा अवमान असल्याचे सूरज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 


तसेच, हे सौंदर्यकरण जनतेच्याच निधीतून झाले असल्याने, स्थानिकांना त्यावर स्वतंत्र शुल्क आकारणे योग्य नाही. या निर्णयावर पुनर्विचार करून स्थानिकांना शुल्कमुक्त प्रवेश देण्याची मागणी सूरज ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी चेतावणी दिली आहे की, जर त्यांच्या मागण्यांचा विचार केला गेला नाही, तर सर्वपक्षीय आंदोलन उभे केले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. Gadchandur Amlanala


#Implementation #Gadchandur #Beautification #EntranceCharge #LocalAnger #Pollution #Highway #mahawani #mahawaniNews

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top