रक्षकच बनले भक्षक : वरणगाव पोलिसाचा प्रताप.

Mahawani


पुरावे देऊन ही आरोपीला घालताय पाठीशी.



महावाणी - विर पुणेकर
०६ ऑगस्ट २०२४

वरणगाव : मागील डिसेंबर महिन्यापासून वरणगाव पोलीस स्टेशनचे ( Varangaon Police Station ) प्रभारी अधिकारी हे महेंद्र पाटील राहणार फुलगाव ता. भुसावळ जि. जळगाव यांना जब्रन घर खाली करण्याकरिता दबाव आणत त्यांच्या मित्र मंडळींना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून नाहक त्रास देत होते. १ जानेवारी २०२४ रोजी पोलीस स्टेशन वरणगाव येथे सौ. ज्योती महेन्द्र पाटील ( Mrs. Jyoti Mahendra Patil ) यांना श्री. भरत यशवंत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरणगाव पोलीस स्टेशन, यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ, मारहाण करून अन्याय केलेला आहे. या संदर्भात श्री. यम. राजकुमार, जुने पोलीस अधीक्षक, जळगाव ( Mr. M. Rajkumar, former Superintendent of Police, Jalgaon ) यांना भ्रमणध्वनी व ई-मेल द्वारे तक्रार दिली असता त्यांनी वरणगाव पोलीस स्टेशन येथील श्री. भरत यशवंत चौधरी ( Mr. Bharat Yashwant Chaudhary ) यांना कायद्या प्रमाणे योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने वरणगाव पोलीस स्टेशनने एक महिन्या त्रास दिला नाही.


परंतु दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर घटने बाबतची माहिती माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार मागितली असता वरणगाव पोलीस स्टेशन यांनी कुठलेही कारण न देता माहिती नाकारली माहिती नाकारल्याने प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या कडे अपील केली असता अपिलीय अधिकारी यांनी उपलब्ध माहिती तात्काळ निशुल्क देण्याचा आदेश निर्गमित केला होता परंतु सदर आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा माहिती देण्यास नाकारली व संबंधित सीसीटीव्ही ( CCTV ) छायाचित्र पुरावे नष्ट केले असल्याचे महेंद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ( As per Right to Information Act 2005 )


तसेच ४ एप्रिल ते ६ एप्रिल २०२४ रोजी घरात कुणी नसताना घरातील सर्व सामान फेकून घरमालकाच्या संगमताने महेंद्र पाटील ( Mahendra Patil ) व त्यांच्या परिवारावर अन्याय केला असून पोलीस स्टेशन वरणगाव येथे त्यांच्या लहान भावास मारहाण प्रकरणाची तक्रार दाखल नकरता महेंद्र पाटील समेत पूर्ण परिवारावर ३५३ सारखा खोटा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिकता महेंद्र पाटील व परिवाराचे म्हणणे ऐकून त्यांची तक्रार दाखल करणे होती जे करण्यात अली नाही याबाबतचे सीसीटीव्ही ( CCTV ) छायाचित्रे महेंद्र पाटील यांच्या स्त्रोतांच्या माध्यमातून हाती लागले असून सदर सीसीटीव्हीत छायाचित्रण केलेल्या प्रसंगाची तक्रार वरिष्ठांकडे करूनही वरिष्ठ अधिकारी मोन धरून गप्प बसल्याने महेंद्र पाटील हे आझाद मैदान, मुंबई येते उपोषणाला बसले असता गृह विभागाने याबाबतचे दि. ३० जुलै २०२४ रोजी चौकशी पत्र काढले असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 


महेंद्र पाटील व परिवाराची मागणी

मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या कडे महेंद्र पाटील पाटील यांनी खोटे गुन्हे रद्द करत, जब्रन घरात कुणी नसताना घरातील घरा उपयोगी साहित्याची नास - धूस करून साहित्य बाहेर उगड्यावर फेकून नुकसान केल्या बाबतीची व १ जानेवारी २०२४ रोजी घडलेल्या घटनेबाबत योग्य तो न्याय देऊन गुन्हे दाखल करण्याची तसेच या सर्व घटना संबंधी पोलिसांकडून नुकसान भरपाई व योग्य कलमांवे गुन्हा दाखल होण्याची विनंती केलेली आहे. 


तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे ( Yuva Swabhiman Party ) संस्थापक अध्यक्ष बनेरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी सदर तक्रारीबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना पत्र दिले आहे. लवकरच महेंद्र पाटील हे योग्य त्या पुराव्यानिशी चौकशी नझाल्यास, न्याय मिळाल्यास महाराष्ट्राचे राज्यपाल, राज भवन येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असेही महेंद्र पाटील माध्यमांशी बोलत होते.  ( mahawani ) ( Varangaon ) ( mhpolice )


  • माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून महेंद्र पाटील माझ्या कडून खंडणी उखडण्याच्या प्रयत्न करीत आहे. ६ एप्रिल २०२४ रोजी महेंद्र पाटील यांनी स्टेशन डायरी वरती पोलीस अमलदार नावेद अली यांना भ्रमणध्वनी करून  धमकी दिली होती कि, माझ्या वरती गुन्हे दाखल केले व मला त्रास झाला तर मी सर्वात प्रथम स. पो. नि. भरत चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करील. व ६ एप्रिल रोजी महेंद्र पाटील व आमदार रवी राणा यांनी कॉन्फरन्स कॉल वरून मला आमदार रवी राणा यांनी धमकी दिली होती कि, महेंद्र पाटील यांच्या वर गुन्हा दाखल करू नका गुन्हा दाखल केल्यास आपण अडचणीत येणार - श्री. भरत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरणगाव 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top