आमदार सुभाष धोटे यांनी दिला मदतीचा शब्द
१० ऑगस्ट २०२४
कोरपना : कोरपना तालुक्यातील धानोली येथे गुरुवारी सायंकाळी एका घरात घडलेल्या भीषण गॅस स्फोटात गृहिणी ज्योत्स्ना भाष्कर पंधरे गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली, जेव्हा ज्योत्स्ना पंधरे स्वयंपाक करत होत्या. अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे त्या गंभीर भाजल्या आहेत, तसेच घरातील अनेक जीवनावश्यक वस्तू आणि वस्त्रांचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे घराचे छत आणि भिंती देखील कोसळल्या, ज्यामुळे कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. (Dhanoli )
घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे ( MLA Subhash Dhote ) यांनी तात्काळ धानोलीला धाव घेतली आणि पंधरे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी ज्योत्स्ना पंधरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि कुटुंबीयांना धीर दिला. तसेच, त्यांनी झालेल्या नुकसानीचे जवळून पाहणी केली आणि कोरपना तहसीलदार व्हटकर यांना कुटुंबाला तातडीने शासकीय मदतीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
स्फोटाच्या या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित मदतीचे आदेश दिले आहेत. आमदार धोटे यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, संबंधित कुटुंबाला संपूर्ण मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. ( korpana )
यावेळी कोरपना येथील कृ.उ.बा.स. संचालक भाऊराव चव्हाण ( Director Bhaurao Chavan ), माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, उपसरपंच संजय जाधव, कदिर डेक, चंदू तोडासे यांसह स्थानिक नागरिकांनीही पंधरे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना मानसिक आधार दिला.
सध्या ज्योत्स्ना पंधरे यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेने धानोलीसह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत पुरवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. #mahawani