भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांची मागणी
- महावाणी - विर पुणेकर
- ०६ ऑगस्ट २०२४
राजुरा : भाजपा कामगार मोर्चा तालुका राजुरा तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य अधीक्षक डॉ. मुणेश्वर भोंगाळे ( Dr. Muneshwar Bhongale ) यांची प्रभारी तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथे नियमित गैरहजर असून त्यांचे वास्तव्य भंडारा ( Bhandara ) येथे असल्याने राजुरा उपजिल्हा रुग्णालय ( Rajura Sub District Hospital ) येथे रुजू झाले तेव्हापासून रजेवर गेले आणि अद्याप परतले नसल्याने सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचाराचा अभाव व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हजर असलेले कर्मचारी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना उद्धट वागणूक देत असल्यामुळे अनेकांची हाल अपेष्टा होत असून अनेक रुग्णांना उपचाराभावी रेफर टू चंद्रपूर केले जात आहे. यामुळे बऱ्याच जणांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे ( Mahadev tapase ) यांनी निवेदनाद्वारे शिष्टमंडळासोबत लवकरात लवकर नियमित आरोग्य अधीक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भारतीय जनता पार्टी ( bjp ) कामगार मोर्चा द्वारे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, माजी किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजू घरोटे, जनार्धन निकोडे, संजय जयपुरकर, राजू गैरशेट्टीवार उपस्थित होते. ( mahawani ) ( rajura ) ( Bharatiya Janata Party Labor Front )