तिन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
संग्रहीत छायाचित्र |
- महावाणी : विर पुणेकर
- २४ ऑगस्ट २०२४
चंद्रपूर : ३ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा धक्कादायक प्रकार घुग्घूस पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला होता. आरोपी सुरज प्रभाकर तुराणकर (वय ३०) असे आरोपीचे नाव असून, या घटनेने परिसरात खळबळ उडवली होती. Justice Served
या प्रकरणाची तक्रार पीडित चिमुरडीच्या पालकांनी घुग्घूस पोलीस स्टेशनमध्ये केली होती. तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये आरोपीने ३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला होता. पोलिसांनी त्वरित कारवाई करत सुरज तुराणकर याला अटक केली आणि भादंवी कलम ३७६, ३७६ (१) (२), ३७६ (ऐ) (बी) सह लैंगिक गुन्हयापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे यांनी केला. त्यांनी आरोपी विरुद्ध सबळ साक्ष पुरावे गोळा केले आणि जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयात हा खटला न्यायाधीश अनुराग दिक्षीत यांच्या समोर चालला. साक्षीदारांचे जबाब, न्यायालयातील पुरावे आणि सरकारी वकिलांचे युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश दिक्षीत यांनी आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. Justice Served
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल आसिफ शेख यांनी काम पाहिले. तसेच, पोहवा चंपत कांबळे यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून आपले कर्तव्य निभावले. या निर्णयामुळे पीडित चिमुरडीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे, आणि अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
प्रत्येक लैंगिक गुन्ह्यातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. मी केलेल्या तपासात गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाल्याने मी समाधानी आहे. - सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे
#ChandrapurNews #Crime #JusticeForVictim #MaharashtraCrime #Ghugus #MahawaniNews #Maharashtra #Chandrapur #Rajura #News #BreakingNews #LatestNews #LocalNews #Politics #SocialIssues #Agriculture #Farmers #Education #Health #Development #Economy #Environment #Cultural #Sports #Technology #MahawaniNews #Justice Served