प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आणि सोंडे आढळल्याची घटना
चॉकलेटमधील जिवंत अळ्याचे छायाचित्र |
- महावाणी : विर पुणेकर
- ३१ ऑगस्ट २०२४
राजुरा : २८ ऑगस्ट रोजी राजुरा तालुक्यातील मार्डा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत चॉकलेटचे वितरण करण्यात आले. इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी चॉकलेट फोडून पाहिल्यावर त्यात जिवंत अळ्या आणि सोंडे आढळली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना ही माहिती दिली. मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी तातडीने राजुरा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी मनोज गौरकर यांना सूचित केले. Live worms in chocolate
मनोज गौरकर यांनी तातडीने या घटनेची दखल घेत मार्डा आणि आर्वी येथील चॉकलेट सिल करून तपासणीसाठी पाठवले आणि अहवाल चंद्रपूर जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला. या घटनेनंतर राजुरा, कोरपना व जीवती तालुक्यात चॉकलेट वितरण तातडीने थांबवले आहे. तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांना चॉकलेट परत मागवले जाणार असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
या घटनेने विद्यार्थ्यांच्या पोषणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आणि सोंडे आढळल्याने पुरवठा व्यवस्थेतील गंभीर तफावत स्पष्ट झाली आहे. यामुळे शाळा आणि पंचायत समितीने त्वरीत तपासणी व कारवाई करणे अत्यावश्यक आहे. तसेच, अशा घटनांमुळे पोषण योजनांवरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे. Live worms in chocolate
मार्डा आणि आर्वी येथे चॉकलेटमधील अळ्या आणि सोंडे आढळल्याने संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली जात आहे. वितरण थांबवून तपासणी सुरू करण्यात आली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
#Mahawani #Rajura #Marda #Education #NutritionScheme #Chandrapur #ParentConcerns #FoodSafety #SchoolIssues #GovernmentAction #ChocoContamination #Arvi #Korapna #Jivti #ChocolateDistribution #Live worms in chocolate