Major Food Seizure in Chandrapur | चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनातर्फे मोठी कारवाई

Mahawani

 

३ लाख २७ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त



  • महावाणी : विर पुणेकर
  • २४ ऑगस्ट २०२४


चंद्रपूर : महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखु यांसारख्या अन्नपदार्थांवर पूर्णपणे बंदी आहे. १२ जुलै २०२४ च्या अधिसूचनेनुसार २०२४-२५ साठी देखील या प्रतिबंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा भाग म्हणून काल २३ ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठा कारवाईचा निर्णय घेतला आहे.


अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी. सातकर यांनी २२ ऑगस्ट रोजी गडचांदूर येथील हाजी अनवर रज्जाक आलेख यांच्या स्थानी तपासणी केली. तपासणी दरम्यान, होलाः हुक्का शिशा तंबाखु, ईगल हुक्का शिशा तंबाखु, मजा १०८ हुक्का शिशा तंबाखु, विमल पानमसाला यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा सापडला. या साठ्याची एकूण किंमत ३ लक्ष २७ हजार २८५ रुपये आहे.


सदर अन्नपदार्थांचे अनौपचारिक नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, उर्वरित प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा ताब्यात घेतला आहे. गडचांदूर पोलिस स्टेशनमध्ये IPC कलम २७३ आणि २७४ अंतर्गत एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू आहे.


अन्न व औषध प्रशासन विभागाने चेतावणी दिली आहे की, चंद्रपूर जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती किंवा व्यवसायिक प्रतिबंधित अन्नपदार्थांचा वापर किंवा विक्री करणार नाही, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.


#Chandrapur #Ballarpur #Rajura #Gadchandur #Mule #Chimur #Pombhurna #Savli #Kanhere #Maharashtra #Chandrapur #Rajura #News #BreakingNews #LatestNews #LocalNews #Politics #SocialIssues #Agriculture #Farmers #Education #Health #Development #Economy #Environment #Cultural #Sports #Technology #MahawaniNews


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top