योजनेचे लाभ मिळाल्याने ग्रामीण भागात आनंदाचा माहोल
१४ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्यातील महिलांच्या खात्यात स्थलांतरित होण्यास सुरुवात झाली असून, महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे, प्रत्येक पात्र महिलेला प्रती महिना ₹१५००/- प्रमाणे दोन महिन्यांचे पैसे राखी सणाच्या आधी जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, काही महिलांच्या खात्यात ₹३०००/- जमा झाल्याचे समजते.
राज्य सरकारने महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी 'लाडकी बहिण' योजना सुरू केली होती. या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे महिलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. महिलांमध्ये समाधानाची भावना निर्माण करण्यासाठी महिलांचे कल्याण हा सरकारचा मुख्य उद्देश आहे, असे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती सुनील तटकरे ( Aditi Sunil Tatkare ) यांनी सांगितले. ( Chief Minister's Beloved Sister Scheme )
सर्वसामान्य महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांमध्ये समाधानाची भावना आहे. योजनेचे लाभ मिळाल्यामुळे अनेक महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, घरगुती गरजांसाठी, तसेच इतर आवश्यक खर्चांसाठी या लाभाचा उपयोग करणार असल्याचे सांगितले आहे. तज्ञांनीही या लाभाचा उपयोग महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी होईल असे म्हटले आहे.
तथापि, अजूनही काही महिलांनी आपला बँक खात्यात सदर लाभ जमा झाला आहेत का हे तपासणे सुरु केले आहे. सरकारकडून अद्याप या योजनेचा संपूर्ण लाभ सर्व पात्र महिलांना मिळाला नाही, मात्र यासाठी लवकरच कार्यवाही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
सरकारकडून योजनेचे लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. तसेच, योजनेबाबत कुठलेही शंका अथवा अडचणी असल्यास महिलांनी आपल्या संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ३,०००/- रुपये जमा करून एक आदर्श उदाहरण स्थापित केले आहे. महाविकास आघाडीमधील नेते मंडळींनी महाराष्ट्रात महायुतीबद्दल अफवाह पसरवणारे आणि लाडक्या बहिणीची थट्टा करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी "जोर का झटका" देत उत्तर दिले आहे. ज्या बहिणीच्या खात्यात ३,०००/- रुपये जमा झाले, त्यांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे आभार मानत खात्यात जमा झालेल्या रकमेसंबंधीचा स्क्रीनशॉट पाठवला आहे. - शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख श्री. संतोष पारखी
#MaharashtraNews, #ChandrapurCrime, #GadchiroliUpdates, #MaharashtraPolice, #DistrictCouncil, #MaharashtraDistricts, #VidarbhaNews, #CrimeInMaharashtra, #MaharashtraTheft, #MaharashtraPolitics, #MaharashtraAgriculture, #GovtJobsMaharashtra, #MaharashtraEmployment, #MaharashtraWeather, #MaharashtraEducation, #MaharashtraEconomy, #MaharashtraCrime, #MaharashtraLawAndOrder, #MaharashtraTraffic, #MaharashtraHealth, #MaharashtraDevelopment, #RuralMaharashtra, #Mahawani, #MahawaniNewHub, #MahawaniNews, #MaharashtraCulture, #MaharashtraFestivals, #MaharashtraSports, #MaharashtraInfrastructure, #MaharashtraTourism, #MaharashtraUpdates, #MaharashtraGovt, #MaharashtraTechnology, #MaharashtraEnvironment, #MumbaiNews, #PuneNews, #NagpurNews, #NashikNews, #AurangabadNews, #KolhapurNews, #ThaneNews, #SolapurNews, #SataraNews, #RaigadNews, #NandedNews, #AmravatiNews, #AhmednagarNews, #JalgaonNews, #YavatmalNews, #LaturNews, #DhuleNews, #BeedNews, #JalnaNews, #BhandaraNews, #WardhaNews, #OsmanabadNews, #PalgharNews, #SindhudurgNews, #RatnagiriNews, #ParbhaniNews, #WashimNews, #GondiaNews, #HingoliNews, #AkolaNews, #BuldhanaNews, #LadkiBahinYojna, #CmShinde #SantoshParkhi