माणुसकीचे दर्शन: श्री. हितेश चव्हाण यांची अपघातग्रस्तांना तत्पर मदत !

Mahawani


रुग्णालयाच्या सुविधांची तातडीने सुधारणा करणे गरजेचे.



महावाणी - विर पुणेकर
०६ ऑगस्ट २०२४


गडचांदूर : भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष व मित्रांगण युवा मंच, गडचांदूर, संस्थापक श्री. हितेश चव्हाण यांनी आपल्या माणुसकीचे उत्कृष्ट दर्शन घडवले आहे. त्यांच्या तत्परतेने व सहकार्याने दोन अपघातग्रस्त व्यक्तींना वाचविण्यात यश आले आहे.


सविस्तर वृत्त असे आहे की, श्री. हितेश चव्हाण ( Mr. Hitesh Chavan ) आपल्या कामानिमित्त कोरपणा जात असताना, रस्त्यावर सोनुर्ली आणि आसन गावाच्या मधे एक ट्रक उभा होता. त्याचवेळी शिवाजी नरवळ व कृष्णा नरवड दोघे रा. पिटीगुडा तालुका. जिवती जिल्हा. चंद्रपूर Shivaji Narval and Krishna Narvad ) या दोन मुलांनी उभ्या ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली व रस्त्यावर पडली. अपघाताची खबर मिळताच अनेक लोक घटनास्थळी जमा झाले, पण श्री. हितेश चव्हाण यांनी विचार नकरता तत्परतेने आपल्या कारमध्ये दोन्ही अपघातग्रस्तांना गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात ( Rural Hospital of Gadchandur ) पोहोचवले.


गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दोघांवर प्रथमोपचार करण्यात आला आणि त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्यांना त्वरित चंद्रपूर Chandrapur ) येथे रेफर करण्यात आले. श्री. हितेश चव्हाण यांच्या या माणुसकीच्या कार्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. या प्रसंगामुळे श्री. हितेश चव्हाण यांची माणुसकी आणि तत्परता संपूर्ण समाजासाठी एक आदर्श ठरले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तींना केवळ वाचवलेच नाही, तर समाजात माणुसकीचे एक सुंदर उदाहरणही प्रस्तुत केले. या शनी त्यांचे सहकारी श्री. प्रमोद पायघन, रा. आसन, श्री. सत्यदेव शमा, रा. गडचांदूर, श्री. अजय रोगे, रा. लखमापूर हे उपस्थित होते. 


गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णांना तत्काळ वरिष्ठ रुग्णालयात रेफर केले जाते, ज्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे, श्री. हितेश चव्हाण यांनी सांगितले. रुग्णालयाच्या सुविधांची तातडीने सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ( mahawani ) ( gadchandur ) ( korpana ) 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top