मोठ्या संख्येने जुन्या दुचाकी इमारतीच्या छतावर !
०२ ऑगस्ट २०२४
चंद्रपूर : घुटकाळा वॉर्ड येथील वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या इलियाज खान यांचा मालकीच्या लकी गराजवाला यांच्या घराला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सफाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान घुटकाळा वॉर्ड येथील लकी गॅरेजवाला ( Lucky Garage ) येथील मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्टस गॅरेजमालकाच्या घराच्या छतावर अनेक दिवसांपासुन साचवून ठेवले असल्याचे आढळले. मोठ्या प्रमाणात स्पेअर पार्टसचा खच असल्याने त्यात पाणीही मोठ्या प्रमाणात साचुन असल्याचे निदर्शनास आले.
परिणामतः अश्या ठिकाणी डेंग्यु डासांच्या लारवांची उत्पत्ती होऊन शहरात डेंग्यु उद्रेक होण्याची शक्यता असल्याने त्या वाहनांचे स्पेअर पार्टसची तात्काळ पर्यायी व्यवस्था करून परिसर स्वच्छ करण्याची नोटीस मनपामार्फत बजाविण्यात आली आहे. सदर प्रकार पुन्हा आढल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ तसेच साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असे नोटीस मधून कळवण्यात आले आहे. ( Municipality notice to motor garage at Ghutkala )
पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर, टायर, भंगारातील वस्तु, डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. ( mahawani ) ( cmc ) (chandrapur ) ( chandrapur mahanagar palika ) ( Dengue )