तहसील कार्यालयातील लिपिकावर कारवाई व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची सूरज ठाकरे यांची मागणी
- महावाणी : विर पुणेकर
- २५ ऑग २०२४
राजुरा : नागभीड तालुक्यातील एका दुर्दैवी घटनेनंतर समाजात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. या घटनेत एका मनोरुग्ण महिलेवर रात्रपाळी बस्थानकातील प्रसाधनगृहात नेऊन अत्याचार करून त्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमात प्रसारित करण्यात आला. या प्रकरणातील पाच आरोपीना अटक करण्यात अली असून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी आप नेते सुरज ठाकरे यांनी केली आहे. तसेच १२ ऑगस्ट रोजी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर सुरज ठाकरे सह तालुक्यातील नागरिक तहसीलदार, राजुरा यांना २७ ऑगस्ट रोजी निवेदन देणार आहे. "या निर्दयी घटनेत सामील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी" असे निवेदनात म्हटले आहे.
राजुरा तहसील कार्यालयातील महिला लिपिक विद्यार्थ्यांचे डोमेसाईल, जात प्रमाणपत्र इत्यादी अर्ज निकाली काढण्यास दिरंगाई करत असल्याचे आरोप सूरज ठाकरे यांनी केले आहेत. या लिपिकेची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाकरे यांनी या लिपिकेवर नागरिकांशी अरेरावीने वर्तन करण्याचेही आरोप केले आहेत. त्यांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित लिपिकेवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
तालुका व जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळा आणि कॉलेजेसमध्ये सीसीटीव्ही तात्काळ बसवण्याची मागणीही सूरज ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी सुरक्षा व विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. तसेच, हे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी अहवाल मागविण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
#NagbhidRape #NagbhidJustice #ChandrapurNews #ChandrapurDistrict #MaharashtraCrime #JusticeForVictim #CongressAction #DeathPenaltyDemand #MahawaniNews