ग्रामस्थांच्या नेतृत्वात राजुरा पोलीस ठाण्यावर कठोर कार्यवाहीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार देते वेळचे छायाचित्र |
- महावाणी : विर पुणेकर
- ३१ ऑगस्ट २०२४
राजुरा : तालुक्यातील पेलोरा येथील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात एकत्र येऊन आपल्या नारीशक्तीचे प्रदर्शन केले आहे. सरपंच अरूणा विनोद झाडे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस पाटील माधुरी खुजे, तंटामुक्त अध्यक्ष वसंता भोयर व इतर महिलांनी राजुरा पोलीस ठाण्यावर धडक दिली. गावातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात तक्रार नोंदवली आणि दोन दिवसांच्या आत कठोर कारवाईची मागणी केली आहे. Pellora Protest Illegal Liquor
गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेते बुधाजी चेन्नुरवार, गणेश टेकाम, शोभा टेकाम, पत्रू टेकाम, सुनिता सिडाम, आणि इंदिरा आत्राम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून हे विक्रेते गावात दारू विकून सामाजिक व्यवस्थेला धक्का पोहोचवत आहेत. विशेषत: शोभा टेकाम यांच्यावर अश्लील शिवीगाळ केल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
महिलांनी पोलिसांना इशारा दिला आहे की जर दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास, तीव्र आंदोलन करण्यात येईल. या वेळी सरपंच अरूणा झाडे, पोलीस पाटील माधुरी खुजे, तंटामुक्त अध्यक्ष वसंता भोयर, तसेच अनेक महिलांचा सहभाग होता.
पेलोरा गावातील महिलांनी दाखवलेली धैर्यशीलता आणि त्यांची जागरूकता समाजासाठी आदर्शवत आहे. गावातील दारू विक्रीमुळे अनेक प्रकारच्या सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या महिला अवैध दारू विक्री विरोधात लढत आहेत, हे त्यांच्या एकजुटीचे द्योतक आहे. दारू विक्रेत्यांच्या विरोधात महिलांनी केलेली तक्रार आणि त्यांच्या कारवाईची मागणी योग्य आहे. पोलिसांनी या तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. Pellora Protest Illegal Liquor
पेलोरा गावातील महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांचा आंदोलनाचा इशारा त्यांच्या सामाजिक भानाचा उत्तम प्रत्यय देतो. या घटनेने ग्रामीण महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे, जे समाजाच्या सुधारणेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
#RajuraPolice #IllegalLiquor #WomenEmpowerment #PelloraProtest #SocialAction #VillageSafety #LiquorBan #CommunityAwareness #WomenPower #LawAndOrder #MaharashtraNews #RuralIndia #CivicAction #SocialJustice #ProtestForChange #CommunityLeadership #Mahawani #PelloraProtestIllegalLiquor