प्रशासन लाडक्या बहिणींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यास असमर्थ -श्री. सुरज ठाकरे
तहसील कार्यालय, राजुरा येथे निवेदन देतांना |
- महावाणी : विर पुणेकर
- २८ आगस्ट २०२४
राजुरा : महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याकरिता शासन प्रशासन आणखी बलात्कार होण्याची वाट पहात आहे काय? असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्याला काळीमा फासला आहे. बसस्थानकावर एका मतिमंद मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार करून चित्रीकरण केले, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
बलात्काराच्या घटना: वाढत्या घटनांनी संतप्त जनता
संपूर्ण देशभरात बलात्काराच्या घटनांचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. परराज्यातील कोलकत्ता येथील दुःखद घटनेनंतर महाराष्ट्रातील बदलापूर येथील घटना आणि यानंतर नागभीड येथे घडलेल्या घटनेने जनतेचा संताप अधिकच वाढवला आहे. नागभीडच्या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर शेकडो स्थानिक महिलांनी आणि आम आदमी पक्षाचे पदाधिकारी श्री. सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने केली. या घटनांमध्ये दोषी नराधमांना तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाची असंवेदनशीलता: सुरज ठाकरे यांचा सवाल
एका रात्रीत सत्ता बदल, नोट बंदी, लॉकडाऊन होऊ शकते, तर बलात्कारासाठी फाशी का नाही? असा सवाल श्री. सुरज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळा, कॉलेज, वस्तीगृह, आणि आश्रम शाळांमध्ये तात्काळ CCTV कॅमेरे लावण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे.
राजुरा तहसील कार्यालय: नागरिकांची समस्या
राजुरा तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, व इतर अत्यावश्यक कागदपत्रांची कामे जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी श्री. सुरज ठाकरे यांच्याकडे केल्या. यानंतर त्यांनी नायब तहसीलदार श्री. चंद्रशेखर तेलंग यांना निष्क्रिय अधिकारांची बदली करून प्रामाणिक आणि सक्रिय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली.
गडचांदूर अमलनाला धरण: प्रदूषण आणि पर्यटन शुल्क आकारणी
गडचांदूर भागात सिमेंट कंपन्या आणि वेकोलीच्या वाहतुकीमुळे प्रदूषणाचा दुष्परिणाम सोसावा लागत आहे. अमलनाला धरणाच्या सौंदर्यकरणाचा उपभोग घेण्यासाठी शुल्क आकारले जात असल्याबाबत संतप्त नागरिकांनी तक्रार केली आहे. श्री. सुरज ठाकरे यांनी या बाबतीत संबंधित प्रशासनाकडे अत्यल्प शुल्क आकारण्याची मागणी केली आहे.
संवेदनशील मुद्दे आणि नागरिकांच्या मागण्या
या सर्व घटनांमध्ये नागरीकांचा आवाज आणि त्यांच्या समस्या यावर लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासनाने तात्काळ योग्य पावले उचलून नागरिकांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी अपेक्षा आहे.
बलात्काराच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी तात्काळ कठोर निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा या देशातील जनता आपल्या आवाजाने सत्ता हादरवेल. — सूरज ठाकरे, आम आदमी पक्ष
#NagbhidIncident #DeathPenaltyDemand #WomenSafety #PublicOutcry #MaharashtraNews #ChandrapurNews #MahawaniNews #Rajura