Sexual assault case | संगणक क्षेत्रातील नौकरीच्या बहाण्याने मुलीवर अतिप्रसंग: आरोपी फरार

Mahawani

मुलीला नौकरीसाठी उमरेडमध्ये नेऊन अतिप्रसंग करणाऱ्या आकाश टेंभूर्णे विरोधात गुन्हा दाखल

Sexual assault case
संग्रहित छायाचित्र

  • महावाणी : विर पुणेकर
  • २९ ऑगस्ट २०२४

सिंदेवाही : सिंदेवाहीतील २३ वर्षीय मुलीवर संगणक क्षेत्रात नौकरी लावून देण्याचे वचन देऊन आकाश टेंभूर्णेने तिला उमरेड येथे एका लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला. मुलगी तिच्या वडिलांसोबत सिंदेवाही येथे राहत होती. २८ ऑगस्ट २०२४ रोजी ती घरी परतली नाही, त्यामुळे वडिलांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. २९ ऑगस्ट २०२४ रोजी, वडिलाला मुलीचा फोन आला आणि ती उमरेडमध्ये आहे, असे सांगितले. वडिलांनी तातडीने उमरेड गाठले आणि मुलीला रात्री घरी आणले. आणि मुलीने घरी आल्यावर आपल्या आई-वडिलांना तिच्या सोबत घडलेली घटना सांगितली. त्यानुसार, आकाश टेंभूर्णेने संगणक क्षेत्रातील नौकरीसाठी फसवणूक करून तिला उमरेडमधील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला असे सांगितले. Sexual assault case


मुलीने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, आरोपी आकाश टेंभूर्णे या घटनेनंतर फरार आहे. पोलिसांनी आकाश टेंभूर्णे विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३७६ (अतिप्रसंग) आणि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.


या घटनेने महिला सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. संगणक क्षेत्रातील नौकरीसाठी विश्वास ठेवून मुलीला फसवून अतिप्रसंग घडवणे, हे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे. आरोपीला तातडीने पकडणे आणि न्याय देणे आवश्यक आहे. Sexual assault case


#SexualAssault #AkashTembhurne #Sindevahi #PoliceInvestigation #Mahawani #JobFraud #JusticeForVictims #Chandrapur #CrimeNews #MaharashtraNews #Sexualassaultcase

To Top