चंद्रपुरातील जिल्हा पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरणाचा डाव असल्याने राजीनामाच्या वाटेवर?
ग्राफिक्श वापरून तयार केलेले छायाचित्र |
- महावाणी : विर पुणेकर
- २६ ऑग २०२४
चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न पक्षश्रेष्ठीकडून सुरू असताना गेल्या दोन वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाच्या सहाय्याने आरोग्यासंदर्भातील समस्येचे निराकरण करीत असलेले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अरविंद धिमान यांची उचलबांगळी करुन चंद्रपुर उप तालुका प्रमुखाची चंद्रपूर जिल्ह्या वैद्यकीय मदत कक्ष पदावर नियुक्ति वरोरा जिल्हाप्रमुखांनी वरिष्ठ पदाधिकारी यांची दिशाभूल करुन खोटी माहिती देवून करण्यात आली. त्यामुळे चंद्रपुरातील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या खच्चीकरणाचा हा डाव असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना पुरुष, महिला व युवा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे!
शिवसेना गटातून दोन जिल्हाप्रमुख चंद्रपूर जिल्ह्याला लाभले असून जिल्ह्यात आरोग्यासंदर्भातील जनतेच्या समस्येचे निराकरण करुन बर्यापैकी पक्ष वाढीसाठी प्रयत्नही केले जात आहे. मात्र काही पदाधिकार्यांना पदावरून डावल्याण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षातील काही पदाधिकार्यांकडून केल्या जात आहे. त्यामुळे शिवेसना गटात वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावरून राजकारण तापल्याची चर्चा दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत
शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये आता नाराजीचा सुर उमटू लागला आहे. अरविंद धिमान यांची उचलबांगडी केल्यामुळे, शिवसेना पुरुष, महिला, आणि युवा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या विचारात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र असून, यामध्ये वैद्यकीय मदत कक्षाचे दोन जिल्हाप्रमुख आधीपासून कार्यरत होते. तरीदेखील वरोरा जिल्हाप्रमुखांनी एका नव्या नियुक्तीसाठी प्रयत्न केल्यामुळे, शिवसेना शिंदे गटात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून नाराजीचा सुर
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अरविंद धिमान यांनी चंद्रपूर, बल्लारपूर, आणि वरोरा या विधानसभा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तरीदेखील, अविनाश उके यांची नियुक्ती त्याच क्षेत्राच्या जिल्हाप्रमुख पदावर केल्यामुळे, शिवसेना शिंदे गटात राजकारण तापलेले दिसून येत आहे. अरविंद धिमान यांच्या पदावरून हकालपट्टी केल्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. धिमान यांना पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले असताना, पदावरून काढण्याचा डाव आखल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
आगामी निवडणुकीपूर्वी अंतर्गत राजकारणावर चिंता
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अंतर्गत राजकारण सुरू राहिल्यास, पक्षाच्या वाढीसाठी ब्रेक लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. अरविंद धिमान यांच्या पदावरून झालेल्या राजकारणामुळे, कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची योग्य चौकशी करून निर्णय घ्यावा, जेणेकरून अंतर्गत कलह टाळता येईल आणि पक्षाचे खच्चीकरण होणार नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
#ShivSenaPolitics #ChandrapurNews #MaharashtraPolitics #MahawaniNews #ShivSenaShindeFaction #MedicalAidUnit #ChandrapurDistrict #PoliticalTension #ShivSenaLeadership #AssemblyElections2024