गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्सच्या मागणीला यश.
०७ ऑगस्ट २०२४
राजुरा : गोंडवाना विद्यापीठाने ८ जुलै २०२४ च्या परिपत्रकाद्वारे संलग्नित महाविद्यालयांना ऑनलाईन प्रणालीद्वारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम सेमिस्टर करिता प्रवेश देण्याची प्रक्रिया व मुदत ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत दिलेली होती. मात्र, ग्रामीण व आदिवासी भागात अतिवृष्टी, पूरस्थिती व शेतीची कामे या विविध कारणामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला अद्याप प्रवेश घेतलेला नाही. तसेच, दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे इंटरनेटची गती हळू असल्याने महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेशासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ( Success to Gondwana University Young Teachers' demand )
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेने प्रथम वर्ष प्रवेशासाठी त्वरित मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोरलावार व पदाधिकाऱ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केली होती. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने तात्काळ कारवाई घेत प्रथम वर्ष प्रवेशाची मुदत वाढ २२ ऑगस्ट २०२४ पर्यंत केली आहे. संघटनेच्या वतीने कुलगुरू व प्रशासनाचे आभार मानण्यात येत आहे. ( mahawani ) ( rajura ) ( Gondwana University )