आदिवासी भगिनींनी माजी आमदार निमकर यांना बांधल्या राख्या
- महावाणी : विर पुणेकर
- २४ ऑगस्ट २०२४
जिवती : तालुक्यातील हिरापुर, खडकी आणि पाटण येथे १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मागील २१ वर्षांपासून येथे रक्षाबंधनाच्या दिवशी सौ. अंजनाबाई जंगु सोयाम, सौ. लीलाबाई भिमराव मडावी आणि जानकुबाई दुलनशहा मडावी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे. Jiwati Taluka यावेळी उपस्थित आदिवासी भगिनींनी माजी आमदार सुदर्शन निमकर Sudarshan Nimkar आणि इतर मान्यवरांना राख्या बांधल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव होते. मुख्य अतिथी म्हणून विमाशी चे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, भाजपा नेते सुरेश केंद्रे, आर्या ॲकाडमी पाटण चे संचालक भिमराव पवार, व्यापारी संघटना पाटण अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुधाकर चंदनखेडे, कृउबास राजुरा उपसभापती संजय पावडे, ग्राम पंचायत खामोना सरपंच हरिदास झाडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बोबडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी रक्षाबंधनाचे महत्व उलगडले आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या 'लाडकी बहीण योजना' Ladaki Bahin Yojna बद्दल अभिनंदन केले. तसेच, महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
माजी आमदार सुदर्शन निमकर हे निस्वार्थपणे कुठलाही हेतू न ठेवता सामाजिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्य टिकवतात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.