Wild animal poachers arrested | वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांना केले गजाआड

Mahawani

तीन आरोपींविरुद्ध वन गुन्हा दाखल ; संतोष संगमवार, क्षेत्र सहाय्यक, वीरूर यांची उल्लेखनीय कार्यवाही

  • महावाणी : विर पुणेकर
  • १२ ऑगस्ट २०२४

राजुरा/विरूर : वनपरिक्षेत्र विरूरच्या कविटपेठ राखीव क्षेत्र क्रमांक १३७ मध्ये जिवंत विद्युत तार वापरून वन्यजीवांची शिकार केल्याचा गुप्त माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने त्वरित कारवाई केली. वन कर्मचारीांनी सापळा रचून भद्रु मंग्या जाधव (वय ४४), निवासी कविटपेठ गुडा, याला मोक्यावर पकडले. घटनास्थळावरून दोन आरोपी फरार झाले.


मुख्य आरोपीची चौकशी केल्यानंतर विजय बालाजी बानोत ( Vijay Balaji Banot ) (वय ३५) आणि रुपेश मंजीलाल जाधव ( Rupesh Manjilal Jadhav ) (वय ३०) यांची नावे उघड झाली. वन विभागाने त्यांचा शोध घेतला आणि दोन्ही आरोपींना पकडले. आरोपींच्या ताब्यातून सहा किलो बाइंडिंग तार, एक कमांडो टॉर्च, बांबूच्या खुंट्या, आणि विद्युत लावण्यासाठी वापरलेले अकोडा (हुक) जप्त करण्यात आले. 


आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २६९ (वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन), कलम ४९८ (वन्यजीवांवर हल्ला) आणि कलम २७७ (वन गुन्हे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.  


संतोष संगमवार, क्षेत्र सहाय्यक, यांनी आपल्या अनुभवाचा फायदा घेतले आणि आरोपींना पकडून वनविभागाच्या धडक कार्यवाहीस यश प्राप्त केले. वन विभागाच्या कार्यवाहीमुळे शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत आणि वनविभागाच्या तपास पद्धतींनी वन गुन्हेगारांमध्ये भय निर्माण केले आहे.

#forestdepartmet #rajura #virur #crime #news #Huntingofwildlife #mahawani

To Top