Tree Conservation | मानवी जीवनात वृक्षांचे महत्वपूर्ण स्थान: ऍड. संजय धोटे

Mahawani


राजुरा येथील इको क्लब आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष रक्षाबंधन आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन


Tree Conservation


महावाणी : विर पुणेकर
२० ऑगस्ट २०२४


राजुरा : बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श हायस्कुल राजुरा यांच्या इको क्लब, स्काऊट्स-गाईड्स युनिट, आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या सहकार्याने आयोजित वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रमाने निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सहकार्याने, मध्य चांदा वनविभाग वनोद्यान, निसर्ग निर्वाचन केंद्र राजुरा येथे हा कार्यक्रम पार पडला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ऍड. संजय धोटे यांची उपस्थिती होती, ज्यांनी आपल्या बालपणातील आठवणींनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. धोटे यांनी वृक्षाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत, बालवयापासूनच पर्यावरण संवर्धनाची सवय लावावी असे प्रतिपादन केले. विशेष अतिथी उपविभागीय वनाधिकारी पवन कुमार जोंग यांनी निसर्गातील अन्न साखळी व त्यातील प्रत्येक घटकाच्या महत्त्वावर चर्चा केली. त्यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण योद्धा म्हणून आपल्या परिसरात कार्य करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून एस. डी. येलकेवाड, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे.), अरुण मस्की, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे अध्यक्ष सतीश धोटे, सचिव भास्करराव येसेकर, सुनील मेश्राम, वनपाल सामाजिक वनिकरण , अनंत डोंगे, तालुका अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, संतोष देरकर, सह सचिव नागपूर विभाग, नेफडो, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, मत्ते, गज्जलवार, जयश्री धोटे, इको क्लब प्रमुख, रुपेश चिडे, स्काऊट मास्तर, विकास बावणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयश्री धोटे यांनी केले, तर प्रास्ताविक बादल बेले यांनी केले. जोगापूर वन पर्यटन क्षेत्रातील हनुमान मंदिर देवस्थान परिसरात यावेळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभाग, इको क्लब, स्काऊट्स-गाईड्स युनिटच्या विद्यार्थ्यांनी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी आणि संघटकांनी अथक परिश्रम घेतले.


#TreeConservation #EnvironmentalProtection #RajuraEvent #Tree Raksha Bandhan #The Importance of Nature Conservation #MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraCrime #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #Mahawani #MahawaniNewHub #MahawaniNews #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews 

To Top