Korpana Employment Crisis : कोरपना तालुक्यातील बेरोजगारीचा खळबळजनक बंड

Mahawani

बेरोजगारीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आजी-माजी आमदारांनी साधला फक्त वैयक्तिक लाभ

Korpana Employment Crisis : A scene from the Korpana movement
कोरपना आंदोलनातील दृश्य

  • महावाणी : विर पुणेकर

कोरपना: राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना तालुका सिमेंट, लाइमस्टोन आणि कोळसा उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात औद्योगिक विकास झाला असला तरी येथे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तालुक्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असून त्याचा लाभ स्थानिक युवकांना मिळत नाही, तर त्यांचा फायदा केवळ बाहेरील कामगारांना होत आहे. Korpana Employment Crisis


 



सिमेंट उद्योगाची भरभराट झाल्याने स्थानिक लोकांनी त्यांच्या जमिनी अल्प दरात दिल्या, ज्यामुळे त्यांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा होती. मात्र, उद्योग चालू झाल्यावर स्थानिकांना नोकऱ्या मिळण्याऐवजी, बाहेरील कामगारांना प्राधान्य देण्यात आले. तीन दशकांपासून हा फसवणूकचा खेळ सुरू आहे, तरीही स्थानिक आमदार व प्रतिनिधींनी या गंभीर समस्येचा विचारही केलेला नाही.


सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी स्पष्टपणे सांगितले की, स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या काळातच रोजगाराचे गाजर दाखवले, त्यानंतर त्यांनी स्थानिक बेरोजगार युवकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. आजी-माजी आमदारांच्या याही अपयशामुळे बेरोजगारी वाढत आहे. आणि हेच आमदार सदर कंपन्यात कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहे तर काही आपले मोठं-मोठे ठेके चालवत कंपन्यांकडून मोठी रसद मिळवत असल्याने नागरिकात रोजगाराबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


२७ सप्टेंबरला कोरपना स्थानिक बस स्टॅन्ड चौकात भूषण फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेरोजगार युवकांच्या एकत्र येऊन बासिंग बांधून भव्य वरात काढण्यात आली, ज्यामध्ये “वक्त बदल गया है अब बेटीया नही लडके माँ-बाप पर बोझ है” हे संदेश दिले. या वरातीत स्थानिक बेरोजगारांनी त्यांच्या असंतोषाचे प्रतीक म्हणून मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


बेरोजगार युवकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आणि स्थानिक आमदारांचे याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भूषण फुसे यांनी सांगितले की, कुशल आणि अकुशल कामगारांसाठी रोजगार उपलब्ध न केल्यास त्यांचे आंदोलन सतत सुरू राहील. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ आली आहे.


बेरोजगारी हा एक गंभीर सामाजिक मुद्दा आहे जो प्रगतीच्या मार्गात मोठा अडथळा ठरतो. कोरपना तालुक्यातील खनिज संपत्ती आणि औद्योगिक विकास असूनही, स्थानिक युवकांना रोजगार मिळवण्यासाठी झुंजावे लागते. हे लक्षात घेतल्यास, आजी-माजी आमदारांचे अपयश आणि त्यांची उदासीनता अस्वस्थ करणारी आहे. भांडवलशाही उद्योगांनी स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध न करून देणे ही केवळ लोकशाहीचा अपमान नाही, तर स्थानिक सामाजिक ध्वनीचाही नाश करणारे आहे.


भूषण फुसे यांनी स्थानिक बेरोजगार युवकांच्या समस्यांना आवाज देत सर्वांनाच जागृत केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे युवकांमध्ये आशा जागृत झाली आहे. आजी-माजी आमदारांनी या समस्यांचा विचार न केल्यामुळे निवडणुकीत त्यांच्या विरोधात मोठा जनआक्रोश निर्माण होईल, अशी शक्यता आहे.


बेरोजगारीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असून, स्थानिक आमदारांच्या उदासीनतेमुळे युवकांचे भविष्य धोक्यात आहे. स्थानिक विकासासाठी आणि सामाजिक समृद्धीसाठी बेरोजगारीवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. भूषण फुसे यांचे कार्य आणि आंदोलने या समस्यांवर प्रकाश टाकत आहेत, आणि स्थानिक नेत्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या लक्षात घेण्याची गरज आहे. Korpana Employment Crisis


कोरपना तालुक्यातील बेरोजगारीवर स्थानिक आमदारांचे अपयश आणि उदासीनता स्पष्ट आहे. भूषण फुसे यांच्या नेतृत्वात चाललेल्या आंदोलना मुळे बेरोजगार युवकांनी आवाज उठवला आहे. ही समस्या गंभीर आहे, आणि स्थानिक नेत्यांनी आता तातडीने कार्यवाही केली पाहिजे.


आपले आजी माजी आमदार फक्त निवडणुकीच्या वेळेसच जागृत होतात, त्यानंतर त्यांना ना बेरोजगार युवकांचे दुःख दिसते, ना त्यांच्या समस्या. त्यांच्या निष्क्रियतेमुळेच आज कोरपना तालुक्यातील हजारो युवक रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. यांचे फक्त राजकारण आणि स्वतःची आर्थिक भरभराट यावरच लक्ष आहे, तर स्थानिकांना रोजगार मिळावा याकडे त्यांनी कधीच गांभीर्याने पाहिले नाही. आज हीच मंडळी परप्रांतीय कंपन्यांत 'लीगल अडवायझर' बनून लाखोंची कमाई करत आहेत, पण आमच्या समस्यांकडे मात्र पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीत आम्ही शांत बसणार नाही, आमच्या हक्कांसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे. - भूषण फुसे



#KorpaNaUnemployment #LocalPoliticiansFailure #BhushanFuse #YouthAwakening #MaharashtraPolitics #EmploymentCrisis #CoalIndustry #CementIndustry #Mahawani #MahawaniNews #BerozgarYuva #LocalDevelopment #EmploymentOpportunities #SocialAwareness #RajuraUpdates #KorpanaEmploymentCrisis

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top