जपला राजसाहेबांचा विश्वास, आकाश तिरुपतीवार यांच्या वाढदिवसाला मनसेचा झेंडा हाती
युवक पक्ष प्रवेश करताना चे शन |
- महावाणी : विर पुणेकर
पोंभूर्णा : मनसेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) श्री. किशोर मडगूलवार आणि मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांच्या संकल्पनेतून पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकांचे बिघूल वाजले असून, येणाऱ्या काही दिवसांत विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. MNS Youth Movement
राजकीय पक्षांनी आपआपच्या परीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत आपल्या कौलातून महाराष्ट्राच्या परीवर्तनाला देण्याचे निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रेरित होऊन, पोंभूर्णा तालुक्यातील युवकांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केला.
२१ सप्टेंबर ला मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे आणि राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात अनेक युवकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पदाधिकार्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत पक्षासाठी एकनिष्ठेने काम करण्याचे आवाहन केले. येणाऱ्या काळात अपेक्षित महाराष्ट्राचा नवनिर्माण झालेला दिसेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम, मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले आणि मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम यांनी केले.
पक्षप्रवेश सोहळ्यात मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनसेचे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार, मनविसे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम, मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले, मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनसेचे पोंभूर्णा शहराध्यक्ष निखिल कन्नाके, मनसेविसे तालुका सचिव महेश राजु नैताम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. MNS Youth Movement
या कार्यक्रमाने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि प्रेरणा निर्माण केली आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून प्रेरित होऊन युवा कार्यकर्ते एका ठिकाणी एकत्र आले आहेत, जे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरू शकते. मनसेने नेहमीच युवकांच्या चळवळीवर लक्ष केंद्रित केले आहे, आणि या कार्यक्रमात त्याची स्पष्ट झलक दिसून आली.
युवकांची एकजूट आणि मनसेच्या विचारांची लोकप्रियता आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संकल्पना निश्चितच पक्षाच्या यशात योगदान देतील. MNS Youth Movement
मनसेने पोंभूर्ण्यातील युवकांना एकत्र करून एक नवा उत्साह निर्माण केला आहे. राजसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून युवा कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश करून पक्षाच्या बलस्थानात वाढ केली आहे.
#YouthInPolitics #MNS #Pombhurna #MaharashtraElections #RajThackeray #PoliticalUnity #MaharashtraNirman #Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #marathiNews #MNSYouthMovement #MNSYouthMovement #PombhurnaMNS #RajThackerayLeadership #MaharashtraElections2024 #MNSRally #YouthInPolitics #PombhurnaPolitics #RajThackeraySupporters #MNSInPombhurna #MNSForChange #MaharashtraYouthPolitics #PoliticalYouthPower #MNSExpansion #RajThackerayVision #YouthRevolution #PombhurnaYouthSupport #MaharashtraNirman #YouthJoiningMNS #MNSStrengthens #PombhurnaElections #MNSPoliticalStrategy #YouthPowerInPolitics #MNSRecruitment #RajThackerayFollowers #PoliticalChangeMaharashtra #MNSNewMembers #PombhurnaLeadership #YouthSupportForRaj #MNSForFuture #PoliticalMovementMNS #RajThackerayInspiration #MNSPartyExpansion #MNSDistrictEvent #PoliticalYouthForce #MaharashtraFutureLeaders #RajThackerayInfluence #MNSPombhurnaRally #PombhurnaRajThackeray #PoliticalTransformation #MNSSuccess #MNSGrowingSupport #PoliticalYouthActivism #PombhurnaFuturePolitics #MNSPombhurnaEntry #MNSDistrictLeadership #YouthDrivenPolitics #MNSPoliticalGrowth #RajThackerayPoliticalImpact #MNSMovement #RajThackerayYouth