गडचांदूर मुक्तीधामची अत्यंत दयनीय अवस्था, शेडमधून जळत्या चितेवर पावसाचे पाणी
नगरपरिषद, गडचांदूर यांना निवेदन देताना |
- महावाणी : विर पुणेकर
- ०७ सप्टेंबर २०२४
गडचांदूर : येथील मुक्तिधामाच्या प्रेतजाळण्याच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या बिघाडामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. मुक्तिधामाच्या प्रेतजाळण्याच्या शेडच्या छप्पराचे टिन उखडले गेले असून, त्यामुळे प्रेत जळताना मोकळ्यातून पाणी पडत आहे. यामुळे प्रेत पूर्णपणे जळण्यास अडथळा निर्माण होतो, आणि या समस्येने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. Neglect
स्थानिक नागरिकांनी याबद्दल गडचांदूर नगरपरिषदेला तक्रार केली आहे, परंतु प्रशासनाकडून याकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ५ सप्टेंबर रोजी आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी या समस्येची गंभीरता ओळखून मुक्तिधामाची प्रत्यक्ष पाहणी केली. याक्षणी गडचांदूर शहर अध्यक्ष श्री. मोलिंद सोनटक्के आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रवक्ते श्री. कुणाल चन्ने व यांची टीमही सहभागी होते.
मुक्तिधामातील समस्यांची सत्यता उघडकीस आणण्यासाठी ठाकरे आणि त्यांच्या टीमने चित्रीकरण केले. या चित्रीकरणात असे दिसून आले की, मुक्तिधामात नागरिकांच्या सुविधा अत्यंत दुरावस्थेत आहेत. मुक्तिधामाच्या परिसरात नियमितपणे टाळे लावले जातात, ज्यामुळे विश्रांतीसाठी आणि श्रद्धांजलीसाठी आलेल्या व्यक्तीला आलेल्या पावलाने परत जावे लागतात तसेच मागील एक वर्षांपासून गडचांदूर मुक्तिधामात बिघाडामुळे नागरिकांचा संताप निर्माण झाला आहे.
या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, ६ सप्टेंबर रोजी आम आदमी पक्षाने गडचांदूर नगरपरिषदेला एक तात्काळ निवेदन सादर केले. यामध्ये श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिधामाचे तात्काळ नूतनीकरण करण्यात यावे आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी करण्यात आली. निवेदनाच्या प्रसंगी आम आदमी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, श्री. मिलिंद सोनटक्के, श्री. कुमार कोचेवार, श्री. सुरेंद्र टोंगे, श्री. मंगेश बदखल, आणि श्री. के. बी. दुर्गे उपस्थित होते. Neglect
गडचांदूर नागरिकांची भावना स्पष्ट आहे – यथार्थ श्रद्धांजली आणि योग्य सुविधांसाठी आवश्यक असलेले सुधारणेतील काम तात्काळ हाती घेणे अपेक्षित आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, दुःखाच्या काळात मिळणाऱ्या अशा समस्यामुळे त्यांच्या दु:खात अधिकच भर पडते. यामुळे प्रशासनाकडे नागरिकांचे वास्तविक समस्यांचे निराकरण करण्यात यावे अशी अपेक्षा आहे.
#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #PublicNeglect #FuneralGround #AamAadmiParty #RenovationRequest #CivicIssues #ChandrapurNews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #mahawaniNews #mahawani #MahawaniNewsHub #VeerPunekar #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews #ChandrapurUpdates #MaharashtraEvents #DailyNews #LocalUpdates #BreakingMaharashtra #ChandrapurLocal #RegionalNews #TopHeadlines #Neglect