Reckless auto driver | ऑटोचालकाच्या बेजबाबदारी मूळ शालेय विध्यार्थी धोक्यात

Mahawani

बामणवाडा येथील ऑटो चालकाने शालेय विद्यार्थ्यांना ऑटोच्या क्षमतेपेक्षा अधिक भरून नेल्यामुळे मोठा धक्का; पालकांची संतापजनक प्रतिक्रिया.

Reckless auto driver | A scene where an auto driver is recklessly driving an auto
बे जबाबदारपणे ऑटो चालवत असतानाचे दृश्य

  • महावाणी : विर पुणेकर
  • ०६ सप्टेंबर २०२४

राजुरा / बामणवाडा : येथील स्टेला म्यारीस शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या ऑटो क्रमांक MH-34-D-3303 च्या चालकाने शालेय ऑटोच्या क्षमतेपेक्षा अधिक मुलांना धोकादायक पद्दतीने वाहून नेत होता. ५ सप्टेंबर रोजीच्या घटनेत, ऑटोच्या मागील भागात चिमुकले मुले भरले होते, ज्यामुळे ते चालत्या ऑटोमधून खाली पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. काही मुलांनी "पडतो पडतो" असे ओरडले, परंतु बेजबाबदार ऑटो चालकाने या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. Reckless auto driver


या बेजबाबदार वर्तनामुळे विद्यार्थी मोठ्या धोक्यात होते, आणि सुदैवाने कुठलीही गंभीर दुर्घटना घडली नाही. परंतु, ऑटोमध्ये अतिरिक्त मुलांना वाहून नेणे धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. यामुळे स्थानिक समाजात आणि पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.


मुलांच्या पालकांनी ऑटो चालकावर आणि शाळेवर तीव्र प्रतिक्रिया दर्शवली आहे. त्यांनी शाळा प्रशासनाला यासाठी दोषी ठरवले असून त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. शाळेने मुलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, वाहतूक विभागाने या गंभीर प्रकरणावर लक्ष देऊन संबंधित ऑटोचालकाविरुद्ध आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


या घटनेने ऑटो चालकाच्या बेजबाबदार वर्तनाची गंभीरता दर्शवली आहे. शालेय वाहतुकीसाठी विशेषतः चिमुकल्या मुलांच्या सुरक्षेसाठी नियमांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. यासाठी शाळा प्रशासन, ऑटोचालक, आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधून उपाययोजना करण्याची गरज आहे. वाहतूक विभागाने या घटनेची गहन चौकशी करून योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. Reckless auto driver


बामणवाडा येथील शालेय ऑटोच्या चालकाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची गांभीर्याने दखल न घेता बेजबाबदार वर्तन केले. पालकांनी यावर आक्रोश व्यक्त करत शाळा प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे योग्य कार्यवाहीची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना आणि नियमांची अंमलबजावणी अत्यंत महत्वाची आहे.


#SchoolAuto #RecklessDriving #Bamanwada #StudentSafety #TrafficViolation #Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #marathiNews #Recklessautodriver #MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #mahawaniNews #mahawani #MahawaniNewsHub #VeerPunekar #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews #ChandrapurUpdates #MaharashtraEvents #DailyNews #LocalUpdates #BreakingMaharashtra #ChandrapurLocal #RegionalNews #TopHeadlines

To Top