भद्रावतीत शिवसेना कामगार शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा, कामगारांसाठी नवे आश्वासन
उद्घाटन करते वेळचे छायाचित्र |
- महावाणी: विर पुणेकर
चंद्रपूर: वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून, शिवसेना भारतीय कामगार संघटनेने भद्रावतीत एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायक सोहळा पार पडला. आज भद्रावती तहसील कार्यालयासमोर सिव्हील कामगार संघटना, कर्नाटक एम्टा ट्रांसपोर्ट संघटना आणि भद्रावती बस स्टैंड जवळ ऑटो स्टैंड शाखेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे आणि शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण (भाई) तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. Shiv Sena Union
उदघाटन सोहळ्यात शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी आणि वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या शुभ हस्ते शाखांचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले आणि संघटनेच्या कार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. Shiv Sena Union
या भव्य सोहळ्यात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष दीपक कामतवार, कामगार जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ हेमके, कामगार भद्रावती तालुका अध्यक्ष योगेश म्यानेवार, कामगार भद्रावती शहर अध्यक्ष विकास मडावी, वाहतूक भद्रावती तालुका अध्यक्ष सनी दामोदर, वाहतूक भद्रावती शहर प्रमुख (वाहतूक) बाळू पतरंगे, महिला आघाडी भद्रावती तालुका प्रमुख योगिता घोरुडे, उप तालुका प्रमुख राधा कोल्हे, उपशहर प्रमुख सविता तरारे आणि इतर शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या उद्घाटनामुळे भद्रावतीतील कामगारांमध्ये उत्साहाची लाट येणार आहे. नव्या शाखा उद्घाटनाने कामगारांना अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल असून त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत राहण्यासाठी नवा जोश मिळेल आहे. शिवसेना संघटनेने स्थानिक कामगार आणि ट्रांसपोर्ट क्षेत्रातील समस्यांवर लक्ष देण्याचे ठरवले असून, हे कार्य आगामी काळात प्रभावीपणे पार पाडले जाईल. Shiv Sena Union
भद्रावतीत शिवसेना संघटनेच्या शाखांचे उद्घाटन, कामगारांच्या हक्कांसाठी एक नविन वळण देईल आणि स्थानिक कामगारांसाठी नवीन आशा निर्माण करेल.
भद्रावतीत शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या शाखा उद्घाटनाने कामगारांना नवा आश्वासक दृष्टिकोन प्राप्त झाला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात आणि कामगारांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे.
आजच्या उद्घाटनाने शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या कार्यक्षमतेला एक नवीन दिशा मिळाली आहे. आम्ही कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहू. भद्रावतीतील या नवीन शाखांमुळे कामगारांना अधिक न्याय आणि संधी मिळतील,याचा मला पूर्ण विश्वास आहे. – संतोष पारखी, जिल्हाध्यक्ष, शिवसेना, भारतीय कामगार संघटना चंद्रपुर
#ShivSenaUnion #Bhadravati #CivilWorkers #TransportUnion #AutoStand #ShivSena #WorkforceEmpowerment #LabourRights #PoliticalLeadership #EknathShinde #LaxmanTandel #ShivSenaWorkers #ShivSenaEvent #BhadravatiNews #Chandrapur #Maharashtra #PoliticalUpdates #Mahawani #MahawaniNews #MarathiNews #बातम्या #SantoshParkhiNews