सावलीत पस्तीस लाखाच्या सुगंधित तंबाखू सह वाहन जप्त
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वर कारवाई करताना |
चंद्रपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन आणि अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तपासण्या सुरू आहेत. दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने व्याहाड खुर्द (एस.एस.टी.) चेक पोस्टवर मोठी कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूने भरलेला आयशर ट्रक जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत जवळपास ३५ लाख रुपये असून, दोन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. Assembly Elections
चंद्रपूर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू, जुगार, आणि प्रतिबंधित वस्तूंच्या वाहतुकीवर कठोर बंदी आणली आहे. सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावरून आयशर ट्रकमधून सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याची अवैधरीत्या वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारावर व्याहाड खुर्द चेक पोस्टवर पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित ट्रकला ताब्यात घेऊन तपास केला असता. ट्रक (नंबर: CG-07 CQ-4602) तपासल्यानंतर लोखंडी तारांच्या बंडलांखाली लपवून ठेवलेले मजा १०८ हुक्का शिशा तंबाखूचे २०० ग्रॅम वजनाचे १६८० बॉक्स आणि ५० ग्रॅम वजनाचे १८०० बॉक्स सापडले.
प्रतिबंधित तंबाखूसह वाहनाची एकत्रित किंमत ३४,९३,८०० रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दोन चालकांना अटक करण्यात आली असून इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी (२७ ) – रा. इस्लामनगर, भिलाई, छत्तीसगड, संतोष कुमार सुंदर सिंह ( ४७) – रा. पयली, शहपूरा, मध्यप्रदेश असे यांचे नाव आहे.
दोघांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ आणि भारतीय दंड संहिताच्या विविध कलमांतर्गत सावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि दीपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, आणि अन्य अंमलदारांचा सहभाग होता. Assembly Elections
चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान अवैध वस्तूंच्या वाहतुकीवर कठोर बंदी घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. या कारवाईने सुगंधित तंबाखूची मोठी खेप जप्त करत स्थानिक पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे. अशा प्रकारे अवैध धंद्यांवर केलेल्या कठोर कारवाया आचारसंहितेच्या पालनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
#Mahawani #MahawaniNews #MahawaniUpdates #Chandrapur #Rajura #SSTCheckPost #IllegalTransport #Election2024 #TobaccoBan #PoliceAction #ChandrapurNews #MaharashtraElection #LawEnforcement #PublicSafety #Crackdown