दारून हल्ल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेची जलद कारवाई; वॅगनार जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर |
मुल : पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेमुळे परिसरात घडलेला हिंसक हल्ला अवघ्या दोन तासांत नियंत्रणात आणण्यात आला. किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर हल्ल्यात झाल्याने पोलिसांनी सात आरोपींना तत्काळ अटक करून कायद्याचे भान राखले. Chandrapur Crime
फिर्यादी बंडु परशुराम कांबळे यांनी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नरेंद्र नामदेव कांबळे आणि त्याची पत्नी मनीषा यांनी बबन मारोतराव कांबळे यांच्यासोबत वाद घालून, नियोजित कटानुसार धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रेम चरण कांबळे आणि स्वप्नील सुभाष देशमुख गंभीर जखमी झाले, तर अविनाश कांबळे किरकोळ जखमी झाला होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मूल पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अवघ्या दोन तासात जेरबंद करून गुन्ह्यात वापरलेली वॅगनार चारचाकी वाहन (क्रमांक: MH-34-AA-4424) जप्त केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका आणि अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोडावार, सुमित परतेकी, आणि सपोनि अमितकुमार आत्राम यांनी कौशल्यपूर्ण तपास करत गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बारकाईने कामगिरी करत आरोपींचा शोध घेत आरोपी राजेश बंडु खनके, सचिन बंडु खनके, वैभव राजेश महागावकर, कपील विजय गेडाम, श्रीकांत नारायण खनके, नरेंद्र उर्फ, नरेश नामदेव कामडे, मनीषा नरेंद्र कामडे यांना अवघ्या दोन तासांत अटक केली.
मुल आणि चंद्रपूर भागातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता प्रेरणादायक आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये जलद कारवाईमुळे कायदा सुव्यवस्था कायम राहते आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतो. अशा प्रकारच्या प्रभावी यंत्रणेने गुन्हेगारी रोखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तातडीच्या आणि कुशल कारवाईने समाजात सुरक्षिततेचा संदेश दिला आहे. पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे नागरीकांमध्ये विश्वास आणि शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुल पोलिसांनी केलेले आवाहन नागरिकांनी लक्षात घेत शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Chandrapur Crime
मुल पोलिसांची कामगिरी ही संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. अशा तातडीच्या कारवाईमुळे पोलिसांवरील विश्वास अधिक वृद्धिंगत होत असून भविष्यात अशा घटनांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
#Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #MulPolice #ChandrapurCrime #PoliceAction #FastArrests #CrimeControl #MaharashtraPolice #PoliceEfficiency #PublicSafety #ChandrapurNews #MaharashtraNews #LawAndOrder #WagnerCarSeized #QuickInvestigation #ChandrapurUpdates #CriminalJustice #PolicePerformance #SafeSociety #ChandrapurCrime