Fake News Controversy : फर्जीवाड्याच्या बातमीविरोधात ठाकरेचे थेट आव्हान

Mahawani

सुरज ठाकरे यांचा खोट्या पत्रकारितेविरोधात कायदेशीर लढाईचा इशारा

Fake News Controversy : Suraj Thackeray's controversial banner
विवादित बॅनर

  • महावाणी : विर पुणेकर

राजुरा: आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कामगार नेते श्री. सुरज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी येत्या ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजता सम्राट सेलिब्रेशन हॉल, बल्लारपूर रोड, राजुरा विधानसभा क्षेत्रात आयोजित स्वागतासाठी वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार आणि अशोक वानखेडे यांचे स्वागतासाठी तयार केलेले बॅनर दाखवले होते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अधिकृत कार्यक्रमाचे किंवा मेळाव्याचे संकेत नसून, फक्त दोन्ही पत्रकारांच्या स्वागतासाठीचा हेतू होता असे त्यांनी स्पष्ट केले आहे. Fake News Controversy


परंतु, काही न्युस पोर्टल्सनी या बॅनरवर आधारित चुकीची बातमी प्रसिद्ध केली की "आम आदमी पक्षाच्या फर्जीवाड्याची  वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या कडून पोलखोल" ही बातमी संबंधित दोन्ही पक्षाला विचारात नघेता एकतर्फी प्रकाशित करण्यात आली असल्याचे सुरज ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, ही बातमी फक्त पत्रकाराच्या स्वतःच्या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आली असून त्यात दोन्ही बाजूची विचारणा करायलाहवी होती जे करण्यात अली नाही. ही एकतर्फी बातमी प्रसिद्ध करून त्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे असेही ठाकरे यांनी सांगितले आहे.


सदर बातमी वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक खात्यावरील "यह फेक न्यूज़ है। मैं कहीं नहीं आ रहा हूं। बल्कि मैं अब कहीं आने-जाने को शत-प्रतिशत बंद करने के प्रयोग पर अड़ा हुआ हूं। मैंने पिछले एक साल में हर दिन कई कार्यक्रमों को मना किया है। उन्हें जिन्हें दिल से सम्मान करता हूं और उन्हें भी जिनका योगदान मेरे लिए प्रेरणा स्त्रोत है। जिन्हें मना करने में रूह कांप जाती है, फिर भी मना किया और कहीं नहीं गया। इस पोस्टर पर लिखने का मतलब ही है कि फिर से इस बात को दोहरा सकूं। जब जाना शुरू करूंगा तो उसकी सूचना आपको मिल ही जाएगी लेकिन यह पोस्टर राजनीतिक दल का लगता है। उन सभी का शुक्रिया जिन्होंने पूछा र यह फोटो पकड़ा दिया। धन्यवाद।" ह्या पोस्टवर आधारित आहे. 


वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी काही महिन्या आधी सांगितले होते कि मी फक्त एक्स (X) आणि यूट्यूब चॅनेल youtube वरतीच सक्रिय आहे. या व्हतिरिक्त कुठेही नाही. परंतु फेसबुक मधील ravish kumar या खात्यावर चाळीस लाखाऊन अधिक फोल्लोवेर असून हे खाते अधिकृत आहे कि अनधिकृत याची सत्यता तपासणे तितकेच महत्वाचे आहे असे सुरज ठाकरे बोलत होते. 


सदर खोट्या बातमीविरोधात आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सदर बातमी कोणतीही तथ्य न घेता आणि एकतर्फी प्रसिद्ध करून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अशा प्रकारच्या पत्रकारिता केलेल्या पत्रकारांवर टीका करत म्हटले की, "सुपारीबाज पत्रकारांमध्ये वाढ झाली असून त्यांच्या चुकीच्या बातम्या फक्त समाजात प्रतिष्ठा नष्ट करण्यासाठी आहेत."


त्यांनी पुढे सांगितले की, हे बॅनर फक्त सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अधिकृत कार्यक्रमाचे संकेत नव्हते. "या बॅनरचा अर्थ हा फक्त स्वागताचा आहे, कोणताही कार्यक्रम किंवा मेळावा आयोजित करण्याचा नाही," असे स्पष्ट करून त्यांनी सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.


 



सुरज ठाकरे यांनी संबंधित पत्रकाराविरोधात कायदेशीर खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "सदर पत्रकारावर अब्रूनुकसानीचा दावा आणि समाजात बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात येईल." त्यांनी पत्रकारितेच्या अशा चुकीच्या पद्धतींवर गंभीर टीका केली आणि म्हटले की, "जे पत्रकार तथ्य तपासल्याविना बातम्या प्रकाशित करतात, त्यांना पत्रकार म्हणता येणार नाही."


ही संपूर्ण घटना समाजातील माध्यमांमधील असंतुलन आणि त्यातील गोंधळाचे दर्शन घडवणारी आहे. सुरज ठाकरे यांच्या पोस्टमुळे वरिष्ठ पत्रकारांच्या स्वागतासाठी केलेले बॅनर आणि त्याच्या विरोधात झालेल्या अफवा यातील अंतर स्पष्ट झाले आहे. सुरज ठाकरे यांनी फेक न्यूज विरोधात उचललेली पावले त्यांच्या जनहित कार्याची आणि प्रतिमेची राखण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यांच्या मते, पत्रकारितेचा आधार हा तथ्यांवर आणि दोन्ही बाजूंच्या गोष्टींवर असायला हवा होता, जे या प्रसंगात झाले नाही. त्यामुळे समाजातील एक महत्त्वाची बाजू समोर आली आहे, ती म्हणजे अनधिकृत न्युज पोर्टल्समुळे समाजात चुकीचे संदेश पसरवणे.


या संपूर्ण प्रकरणात, माध्यमांच्या अचूकतेबाबतचा प्रश्न गंभीरतेने समोर आला आहे. फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीच्या प्रसारणामुळे समाजातील व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागतो. सुरज ठाकरे यांनी याविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे, जो समाजातील तथ्यनिष्ठ पत्रकारितेला पाठिंबा देण्याचा संदेश आहे. अशा एकतर्फी बातम्यांच्या विरोधात कायदेशीर लढाई महत्त्वाची ठरू शकते. Fake News Controversy


सुरज ठाकरे यांची सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट आणि त्याच्या विरोधात प्रसारित झालेल्या चुकीच्या बातमीमुळे माध्यमांचे एक वेगळे रूप समोर आले आहे. पत्रकारांनी समाजातील जबाबदारीची जाणीव ठेवून बातम्या प्रसारित करायला हव्यात. फेक न्यूजच्या वाढत्या प्रसारामुळे व्यक्तींच्या प्रतिमेला हानी पोहोचवली जाते, जी आपल्या समाजासाठी घातक आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने फेक न्यूज आणि त्यांच्या प्रसारापासून सतर्क राहण्याची गरज आहे.


प्रसारित झालेली बातमी ही पूर्णतः सत्यहीन आहे. संबंधित पत्रकार स्वतः बातमी लिहत नाही, तर सुपारीबाज पत्रकार यांना ती तयार करून घेतो आणि अनधिकृत पोर्टलवर प्रसारित करतो. मी या खोट्या बातमीवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने हे लेखन करण्यात आले असून, हे केवळ वाचक संख्या वाढवण्यासाठीचा प्रयत्न आहे. सदर पत्रकार हा सुपारीबाज पत्रकाराचा साथीदार आहे, ज्याच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे आहेत. याला पत्रकारितेचा अनुभव नाही आणि लेखनातून स्पष्ट होते की, हे लेखन सुपारीबाज पत्रकारानेच लिहले आहे. - श्री. सुरज ठाकरे, कामगार नेते व जिल्हा उपाध्यक्ष, आम आदमी पक्ष, चंद्रपूर 


#SurajThakre #FakeNewsProtest #RavishKumar #AamAadmiParty #AAPChandrapur #MediaAccountability #FakeNewsExposure #PoliticalScandal #MediaManipulation #SocialActivist #JournalisticIntegrity #ChandrapurPolitics #MediaTransparency #LegalActionAgainstMedia #SlanderAndDefamation #FalseAccusations #MediaResponsibility #PoliticalNewsIndia #MarathiNews #Mahawani #मराठीबातम्या #RajuraAssembly #JournalismEthics #SocialMediaControversy #PressFreedom #SupariJournalism #ChandrapurNews #PoliticalActivism #MediaEthics #MediaBias #FightForJustice #JournalistCredibility #SocialJustice #MediaVsPolitics #FreedomOfSpeech #NewsAccountability #MediaTruth #IndianJournalism #PoliticalBattles #LegalFight #DefamationCase #PublicImage #MarathiPolitics #ChandrapurUpdates #MediaCrisis #PoliticalRumors #InfluentialLeaders #JournalismControversy #FakeNewsAwareness #SupportForSurajThakre #PublicFigureReputation #MediaFactCheck #PoliticalControversy #JusticeAndAccountability #NoToFakeNews #StopMediaAbuse #TruthInJournalism #VoiceForTheVoiceless #MediaSlander #PowerOfTruth #FakeNewsControversy #Rajura 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top