ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची निवेदनातुन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे तातडीची कारवाईची मागणी
गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना |
जिवती | तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या येल्लापुर ग्रामपंचायतीत सध्या ग्रामसेविका मॅडमच्या मनमानी कारभारामुळे गावाचा विकास थांबलेला आहे. १२ सप्टेंबर २०२४ रोजीच्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराचा विरोध केला होता. गावातील विकास कामे लांबणीवर टाकली जात असल्यामुळे ग्रामस्थांनी तिच्या तातडीच्या बदलीची मागणी केली होती. मात्र, सदर अर्ज स्विकारला गेला नाही. परिणामी, गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिनांक २६ सप्टेंबरला गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून हा अर्ज जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे पाठवला. GramSevak Misconduct
येल्लापुर ग्रामसेविका मॅडम यांनी गावातील काही अर्धवट ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना हाताशी धरून गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. चुकीची माहिती पसरवून गावातील शांतता भंग करण्याचे गंभीर आरोप गावकऱ्यांनी निवेदनात केले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी केलेल्या आरोपांनुसार, ग्रामसेविका ग्रामपंचायत कार्यालयात हप्त्याने फक्त दोनच दिवस येतात. गावकऱ्यांनी समस्या मांडण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, ती अरेरावीची भाषा वापरते. याशिवाय, ग्रा.पं. सदस्यांसोबतही तिचे वर्तन अरेरावीचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामसेविकेने गावातील सुशिक्षित युवकांविरुद्ध पोलिसात तोंडी तक्रार दिल्याची घटना सध्या गावात चर्चेचा विषय आहे. या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ व पुरावे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. येल्लापुरमधील शांतता भंग होण्यामागे ग्रामसेविकेचा मोलाचा वाटा असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केले आहेत. तिच्या कारभारामुळे गावातील विकास थांबल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या नियमित कामात होणारा हस्तक्षेप आणि विकास कामांमध्ये होत असलेली दिरंगाई या सर्व बाबींमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामसेविकेच्या या अडचणींमुळे गावात वाद निर्माण झाले असून, पदाधिकाऱ्यांनी तिच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गावातील विकास प्रकल्प थांबले असल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आहे. काही नागरिकांनी ग्रामसेविकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, तिच्या तातडीच्या बदलीसाठी गावकऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. GramSevak Misconduct
गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना ग्रामपंचायत सरपंच, सुमित्रा मेश्राम, उपसरपंच रंजीता जीवने, सदस्य सोनराव पेंदोर, सदस्य प्रशांत कांबळे, कल्याण सरोदे यांचेसह गावातील नागरिक उपस्थित होते.
#Mahawani #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #MahawaniNews #YellapurVillage #GramsevikaMisconduct #VillageDevelopment #DistrictCollector #PeaceRestoration #VillageAffairs #LocalGovernance #ChiefOfficer #GramSevakMisconduct